दत्तगुरू भेट

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

जाऊ चला वाडीला जाऊ औदुंबराला
भेटाया जाऊ चला गुरुदत्ताला ऽ ऽ ऽ . . . १

नदीकाठ मंदिरी समाधान अंतरी
भेटतसे तिथे हरी सद्‌भक्ताला ऽ ऽ ऽ . . . २

मूर्ती गोजिरी अहा किती साजिरी पहा
लाभ सुखशांतीमहा नयनाला ऽ ऽ ऽ . . . ३

नयनांच्या निरांजनी धूपदीपचंदनी
स्वर्गसुखदालनी गुरु गवसला ऽ ऽ ऽ . . . ४

जाऊ नका तुम्ही कुठे गुरु आहे खरा इथे
ब्रह्माविष्णुमहेश दिसे एका जागेला ऽ ऽ ऽ . . . ५

Hits: 290
X

Right Click

No right click