माया

Parent Category: मराठी पुस्तके Category: सय कवितासंग्रह

माया माऊलीच्यापरी
सार्याp जगाच्या बाजारी
शोधू गेले किती तरी
सापडेना बाई बाई . . . १

प्रेमाची ही गंगा खरी
झरे तिच्याच अंतरी
दूर जरि गेली तरी
चित्त घरी बाई बाई . . . २

संतजनांची भलाई
आभाळाची ही निळाई
मूळ पाहू गेले तरी
गवसेना बाई बाई . . . ३

विटेवरची विठाई
सार्याी जगाची हो आई
लेकरांना अपुल्या कध्धी
विसंबेना बाई बाई . . . ४

Hits: 279
X

Right Click

No right click