प्रकरण ५-रासायनिक व भौतिक गुणवत्ता

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

रासायनिक व भौतिक गुणवत्तेबाबत ठरविलेली मानके :
नवीन पाणीपुरवठा शोधणे व पाण्याची उद्योगांच्या मागणीच्या दृष्टिकोनातून उपयुक्तता बघणे यासाठी रासायनिक विशलेषणांचा उपयोग बऱ्याच संशोधनात होतो.
रासायनिक खते वापरलेल्या शेतातून वाहेर पडणारे शेतपाणी वा उद्योगातून बाहेर पडणारी अपशिष्टे पाण्यात निस्सारित होत असल्याची शंका आल्यास घातक द्रव्यांच्या परीक्षणार्थ अनुपचारित पाणी व उपचारित पाणी यांचे नमुने दर ३ महिन्यांतून किमान एकदा तरी गोळा केलेच पाहिंजेत. पाणीपुरवठ्याच्या उगमस्थानापाशी घातक पदार्थ अनुमेय मर्यादेच्या खाली थोड्या प्रमाणात जरी असले तरी अशा तर्‍हेचे नमुने गोळा करण्याची वारंवारता अधिक ठेवावी लागते. त्याचप्रमाणे प्रदूषणाची संभाव्यता जिथे जिथे असेल तिथे व औद्योगिक वसाहतींचे साहचर्य असलेल्या क्षेत्राजवळील पाणीपुरवठ्यामधील नमुने घेण्याची वारंवारता अधिक ठेवणे नेहमीच शहाणपणाचे ठरते.

वारंवार कराव्या लागणार्‍या रासायनिक परिक्षणासाठी गोळा करावयाचे. नमुने पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे गोळा करण्यात येतात. ५०,००० हन अधिक लोकवस्तीला पाणी-पुरवठा करणारे उद्गम असतील तर तेथील नमुने ३ महिन्यांतून किमान एकदा व ५०,००० पर्यंतच्या लोकवस्तीला पाणीपुरवठा करणारे उद्गम असतील तर तेथील पाण्याचे नमुने बर्‍याच वेळा व जास्त वारंवारता ठेवून गोळा करावेत. उद्‌गम नवीन अगर प्रस्तावित असतील तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन बऱ्याच वेळा परीक्षण करावे लागते व त्यावरून वारंवारता निश्‍चित करावी लागते.

सारणी ५.३: रासायनिक विश्लेषणासाठी निर्धारित मानक *
(अ) घातक पदार्थ :
पदार्थ -------------------------------कमाल अनुमेय सांद्रता प्रती लिटरला मिलिग्रॅम (mg/l)

सायनाईड (CN) ---------------------------- ०.०१
शिसे (Pb) ----------------------------०.१०
अर्सेनिक (As) ---------------------------- ०.२०
क्रोमियम (Cr6+) ----------------------------०.०५

(आ) आरोग्यावर परिणाम घडवून आणणारी विशिष्ट रासायनिक द्रव्ये:
काही रासायनिक द्रव्ये पिण्याच्या पाण्यात विशिष्ट सांद्रतेपेक्षा अधिक असली तर ती आरोग्याला विघातक ठरतात. यापैकी काही द्रव्ये ठराविक सांद्रतेपेक्षा कमी असली (विशिष्ट सांद्रतेपेक्षा कमी) तरीही त्यांचा आरोग्यावर विघातक परिणाम घडून येतो

(१). फ्लोराइडे---यांची सांद्रता ०.५ ते १.५ मि. ग्रॅ/लिटर या मर्यादेत हवी. ०. ५ मि. ग्रॅ/लि. पेक्षा कमी किवा १.५ मि. ग्रॅ./ लि. पेक्षा जास्त सांद्रता आरोग्यावरं विघातक परिणाम घडवून आणते.

(२) नायद्रेटे यांची सांद्रता ४५ मि. ग्रॅ./लि. पेक्षा जास्त नको.

या प्रकरणात दिलेली मानके पिण्याच्या व इतर घरगुती वापरावयाच्या पाण्यापुरतीच मर्यादित आहेत. पोहण्याच्या तलावातील पाण्याची गुणवत्ता, सिंचनासाठी वापरल्या जाणा-या पाण्याची गुणवत्ता, शीतनासाठी किवा प्रक्षालनासाठी किवा सर्वसाधारण प्रक्रियांसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याची गुणवत्ता दाखविणारी वेगवेगळी मानके प्रस्थापित केली आहेत. ती या प्रकरणाच्या शेवटी दिली आहेत. औद्योगिक वापरासाठी वापरली जाणारी मानके प्रकरण ९ मध्ये पहा.

या मानकांच्या पार्श्वभूमीवर पाण्यातील निरनिराळी द्रव्ये व त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम पुढील प्रकरणात विस्तृतपणे च्चिलेले आहेत.
---------
* रंग, गढुळता, मूल्य सोडून सवे द्रव्यांची अभिव्यक्ती मिलीग्रॅम लिटर अशी केली:
आहे. हे मानक कुटुंब कल्याण व स्वास्थ्य मंत्रालय, भारत सरकार यांच्यामाफंत १९७१ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
-----------



Hits: 516
X

Right Click

No right click