प्रकरण २ - शरीरातील पाणी

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

कोषिकांतर्गत व आंतरकोषिक द्रव, रक्‍त इत्यादी स्वरूपात असलेले पाण्याचे सरासरी प्रमाण कोणत्याही मानवी शरिरात त्याच्या वजनाच्या ६५ प्रतिशत असते. हे प्रमाण माणसामाणसात किंवा प्रत्येक अवयवात थोड्या फार प्रमाणात बदलणे सहज शक्‍य आहे.

पुरुष आणि स्त्री यांच्या शरिरातील पाण्याच्या प्रमाणातही लिगभेदानुरुप फरक असल्याचे आढळून येते. स्त्रियांच्या शरिरात जलधारण करण्यात तितकीशी कार्यक्षम नसलेली वसोतके अधिक असल्याने पाण्याचे प्रमाण कमी आढळते. त्यांच्या शरिरात एकूण वजनाच्या फक्त ५२ प्रतिशत्‌ पाणी आढळते. पुरुषांमध्येही हे प्रमाण व्यक्तिसापेक्ष असते. वरपांगी कृश दिसणार्‍या पुरुषात पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त, म्हणजे वजनाच्या ७० प्रतिशत्‌ असते. सर्वसामान्य स्वरूपात बघितले तर कोणत्याही पूर्ण वयात आलेल्या मानवाच्या शरिरात अंदाजे ५० लि. पाणी असते. या पाण्यापैकी अंदाजे ३ लि. पाणी सारखे बदलत असते. निः:सारित होणार्‍या व अंतर्वेशित होणाऱ्या पाण्याचे प्रमाण साधारणतः सारखेच असते. याचाच अर्थ रोज साधारणतः ३ लि. पाणी निरनिराळ्या रूपाने शरिरात घेतले जाते व तितकेच बाहेरही टाकले जाते. शरिरात नव्याने येणाऱ्या वा तयार होणार्‍या पाण्याची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल :---

अंतर्वेशित होणारे पाणी =१.७ लि. पिण्याच्या पाण्यावाटे जाणारे +१.१ लि. अन्नावाटे जाणारे +०.२४ लि. अन्नाच्या पचनामुळे शरिरात तयार हाणारे पाणी.= एकूण, शरिरातील पाणी ३.०४ लिटर.

उच्छ्वास, घाम, मूत्र इत्यादींच्या स्वरूपात निःसारित होणाऱ्या पाण्याचे परिमाण अंदाजे, तितकेच म्हणजे ३ लि. असते. अशा रीतीने शरिरातून बाहेर टाकल्या जाणार्‍या पाण्याची विभागणी पुढीलप्रमाणे असते :--
- उच्छवासाच्या रुपाने - ०.४५ लि. म्हणजेच, १५ प्रतिशत.
- घामाच्या रूपाने (उष्ण हवामानात हे प्रमाण ३३ प्रतिशततेपर्यंत वाढते) - ०.६५ लि. म्हणजेच, २० प्रतिशत.
प्रत्यक्ष निःसारित पाणी.- १.१५ लि. म्हणजेच, ६५ प्रतिशत्‌
प्रतिदिन एकूण निःसारित झालेले पाणी- १'५ ते २.५ लि. च्या आसपास. ,
मानवी शरिरातील निरनिराळ्या उतकांमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण सारणी २.१ मधे दाखविले आहे.


सारणी २. १: निरतिराळ्या उतकांमधोल पाण्याचे प्रतिशत प्रमाण *
उतके -------------------प्रतिशत पाणी
मेंदू : धूसर द्रव्य ----------. ८४
श्वेत द्रव्य ---------------- ७०
मुत्रपिंड ----------------- ८१
ऱ्हीय उतके--------------- ७९
फुफ्फुसे ---------------- ७८
उदर व आंतडे ------------ ७५
यकृत ------------------. ७४
त्वचा ------------------- ७७
संपूर्ण सापळा------------- ४५
हाडे (मज्जाविरहित) ------- २२.५
------
* पी. एम. मिचेल यांच्या "A Textbook of Biochemistry” आवृती २ री, १९५० मधून.

Hits: 299
X

Right Click

No right click