दख्खनची दौलत - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक

प्रा. फडक्यांच्या ''तरुण स्त्री-पुरुषांपुढील प्रश्न'' या लेखमालेपासून डॉ. 'किर्लोस्करांच्या ''तरुण महाराष्ट्रापढील आर्थिक धोरण'' या लेखमालेपर्यंत ''किर्लोस्करां''तील कोणतेही वैचारिक आवाहन करणारे लिखाण पहावे. त्यात प्रचलित परिस्थितीची मूलगामी जाणीव आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याची शाखशुद्ध प्रेरणा यांचा संगम आढळून येईल. विचारप्रवर्तनांतून सामाजिक जीवनांचे परिवर्तन हे ''किर्लोस्करां''तल्या अशा प्रकारच्या सर्व लिखाणाचे मुख्य सूत्र होते.वैचारिक लिखाणाच्या जोडीने ''किर्लोस्करा''मे विविध प्रकारचे ललित लिखाण वाचकांना विपुल प्रमाणात दिले. सर्वसामान्य वाचकांचा ललित बाड्मयाकडे स्वभावत:च ओढा असतो. पण ''किलॉस्करा''ने केवळ वाचकवर्गाचे रंजन करून त्याला आपल्याकडे आकृष्ट करून घ्यायचे एवढ्या एकाच हेतूने ललित वाड्मयाचा आदर केला नाही. हे वाडूमय चांगल्या लेखकांनी लिहिलेले असावे आणि त्याच्यांत कलात्मक गुण असावेत ही दक्षता त्याने घेतलीच. पण 'त्याचबरोबर ललित वाड्मय हे लोकजागृतीचे उत्तम साधन होऊ शकते, ललित वाड्मय.हा एक बाजूने जसा कुंचला आहे तसे दुसऱ्या बाजूने ते शस्र आहे, ही जाणीव अखंड कायम ठेवून त्याचा ''किर्लोस्करा''ने कुशलतेने उपयोग केला. १९२०-४७ या कालखंडात ''किर्लोस्करां''त प्रसिद्ध झालेल्या कथा-कादंबर्‍्यांवरून हे सहज दिसून येईल.

ताम्हनकरांचा ''दाजी'' हे या जाणिवेचे एक ठळक उदाहरण आहे. गंभीर व ललित अशा दोन्ही प्रकारव्या नियतकालिकांचा ''किर्लोस्करां''ने नव्या काळाला अनुरूप असा संगम घडवून आणला. त्यामुळे शहरातल्या सुशिक्षितांपासून खेड्यांतल्या साक्षरांपर्यंत सर्व प्रकारचा वाचकवर्ग त्याच्या कक्षेत आला. साहजिकच लोकरंजनाचे आणि लोकशिक्षणाचे फार मोठे काम ''किर्लोस्कर''ने १९२० नंतरच्या काळांत केले. सर्वसामान्य मासिकांत न आढळणारा एक प्रकारचा जोम, एक प्रकारच्या बंडखोरीचा जोष त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच होता. ओसाड माळरानावर उद्योगनगरी निर्माण करणाऱ्या लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या ठिकाणी जी नवी दुर्दम्य प्रेणा धगधगत होती, तीच किर्लोस्कर मासिकाच्या मागेही उभी होती. लोकरंजन आणि लोकशिक्षण या गोष्टी चांगल्या हे तर खरेच! पण तेवढ्या वरच या मासिकाच्या संस्थापकांचे समाधान होण्याजोगे नव्हते. आपल्या समाजाची स्थिती माळरानासारखीच आहे, तिथे धर्मभोळेपणाचा निवडुंग जिकडेतिकडे माजला आहे आणि रुढींची काटेरी झाडे सर्वदूर पसरली आहेत, ही जाणीव ''किर्लोस्करा''ला जन्मत:च होती.

Hits: 414
X

Right Click

No right click