७. आणीबाणी विरुद्ध संघर्ष आणि जनता पक्ष - ४

जनता पक्षाची स्थापना

श्रीमती गांधींनी आकाशवाणीवर निवडणुकीची घोषणा करण्यापूर्वी मोरारजीभाई प्रभृती सर्व नेत्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सर्व नेत्यांची सुटका झाली. त्या आठवड्यात सर्व कार्यकर्तेही सुटले आणि अखेर आणीबाणी संपली. जयप्रकाशजी एस्‌. एम्‌. ना म्हणाले, 'आपण सर्वांचा मिळून एक पक्ष करून निवडणूक लढवली पाहिजे.' एस्‌. एम्‌. नी त्यांच्या सुचनेला पाठिंबा दिला आणि ते नेत्याची मने वळविण्याच्या कामाला लागले. देसाई, चौधरी चरणसिंग आदी नेते प्रथम सावधपणे शंका व्यक्त करीत होते. परंतु जयप्रकाशजी त्यांच्या भूमिकेवर ठाम होते आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीत यश मिळणार नाही, हे ओळखण्याइतके शहाणपण या नेत्यांजवळ होते. पक्षाच्या नावावर थोडी खळखळ झाली. अखेर सुरेन्द्र मोहन यांनी सुचविलेले 'जनता पक्ष' हे नाव सर्वांना मान्य झाले. 'जनता पक्ष' या नावाने निवडणुका लढविण्यात आल्या. महाराष्ट्रात जनता पक्ष कसा बनवायचा, याचा विचार झाला तेव्हा सर्वजण म्हणाले, 'एसेमनी अध्यक्ष झाले पाहिजे. एस्‌. एम्‌. यांनी ते मान्य केले. एस. एम्‌. आणि गोरे या दोन ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीस उभे रहावयाये नाही, असा निर्णय घेतला. निवडणुकीत जनता पक्षाला चांगली मते मिळतील इतकेच एस्‌. एम्‌. यांना वाटत होते. परंतु आणीबाणीच्या काळात अन्याय मूकपणे सोसणाऱ्या जनसामान्यांनी आणीबाणी असलेला त्यांचा विरोध मतपेटीद्वारा व्यक्त केला आणि निवडणुकीत 'जनता पक्षा'स भरघोस पाठिंबा दिला. जनता पक्षाला - जगजीवनरामबाबूंचा लोकशाहीवादी कॉँग्रेस पक्ष आणि अन्य मित्रपक्ष मिळून तयार झालेल्या आघाडीला लोकसभेच्या ५४४ पैकी ३७४ जागा मिळाल्या, त्यांपैकी उत्तर भारतात ३३० जागा मिळाल्या.

जयप्रकाश नारायण दक्षिण भारतात दौरा काढू शकले असते तर तेथेही आधिक जागा मिळाल्या असत्या. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला केवळ १५२ जागा मिळाल्या. इंदिरा गांधी यांचा निवडणुकीत राजनारायण यांनी पराभव केला. 'निवडणुकीतील विजय हे जयप्रकाशजींच्या विभूतिमत्वाला जनतेने केलेले अभिवादन आहे, असे उद्गार आचार्य दादा धर्माधिकारी यांनी काढले. निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीमध्ये सर्व घटक पक्षांच्या बैठकी झाल्या. 'संघटना काँग्रेस', 'लोकदल', 'समाजवादी पक्ष', 'लोकशाहीवादी काँग्रेस' आणि 'भारतीय जनता संघ' या सर्व पक्षांनी आपापले पक्ष बरखास्त करून जनता पक्षात विलीन व्हावयाचे, असा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाच्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी, घटक पक्षांनी आपापले अस्तित्व कायम ठेवून जनता पक्ष हा फेडरल पक्ष' करावा, अशी सूचना केली, तेव्हा एस्‌. एम्‌. म्हणाले, "आपण सर्वजण आणोबाणीविरुद्ध एकत्र लढलो. निवडणुका जनता पक्ष म्हणून लढविल्या. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण आता. आपला पक्ष जनता पक्षात समर्पण भावनेने विलीन केला पाहिजे." एस्‌. एम्‌. तीव्रतेने बोलले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले; परंतु अनेकांच्या मनात जनसंघ आपले अस्तित्व कायम ठेवील, अशी शंका होती. जनसंघाने जनता पक्षात विलीन होण्यास मान्यता दिली, परंतु त्या पक्षाच्या कामगारांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये काम करणाऱ्या संघटनांचे स्वतंत्र अस्तित्व चालूच राहील, असेही जाहीर केले. जनता पक्ष १ मे १९७७ला अधिकृतरित्या अस्तित्वात आला.

जनता पक्षाच्या नेता निवडीच्या प्रश्‍नायाबत एस्‌. एम्‌. आणि नानासाहेब गोरे या दोघांनाही जगजीवनरामबाबू यांनाच नेता निवडावे असे वाटत होते. परंतु हा प्रश्‍न जयप्रकाश नारायण आणि आचार्य कृपलानी यांच्या लवादाकडे सोपविण्यात आला. आचार्य कृपलानी यांनी मोरारजीभाई नेते झाल्याची घोषणा केली. याबाबत एस्‌. एम्‌. नी आत्मकथेत स्पष्टपणे पुढील प्रमाणे लिहिले आहे- "आज तटस्थ मनाने झालेल्या चुकांचा शोध घेत असता माझ्या दृष्टीने हिमालयाएवढी झालेली चूक म्हणजे नेत्याची रीतसर निवडणूक न करता लबादाने तो निर्णय दिला ही हीच."

Hits: 438
X

Right Click

No right click