२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ५

फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणामध्ये पं. नेहरूंनी १९३५च्या सुधारणा कायद्याबद्दल नाराजी आणि निराशा व्यक्त केली. मात्र निवडणुकीवर बहिष्कार न टाकता लोकजागृतीची एक संधी म्हणून निवडणुकीचा वापर करावयाचा असा निर्णव काँग्रेसने एकमताने घेतला. पं. नेहरूंनी निवडणूक प्रचारासाठी जो देशभर दौर केला, त्या दौऱ्यात, या निवडणुका हा स्वातंत्र्य लढ्याचाच भाग आहे; जे लोक परिस्थितीच्या वा वैयक्तिक मर्यादांमुळे चळवळीत सामील शेऊ शकले नाहीत त्यांनी त्यांचा स्वातंत्र्य लढ्याला असलेला पाठिंबा काँग्रेसला मत देऊन व्यक्त करावा', हा संदेश त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविला. त्याचबरोबर पं, नेहरूंनी जातिधर्माचे भेद ओलांडून सर्व भारतीय समान आहेत ही भूमिकाही जनतेच्या मनावर ठसवली आणि स्वतंत्र भारतात श्रमिकांना, दलितांना, उपेक्षितांना न्याय दिला जाईल, असेही आश्वासन स्पष्टपणे दिले.

एस्‌. एम्‌. आणि गोरे यांनो समाजवादी कार्यकर्त्याची पुण्यामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीत पं. नेहरूंच्या वैचारिक भूमिकेच्या आधारे गावोगाव सभा घेऊन मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी निवडणुकीत काम करावयाचे असा एकमताने निर्णय घेण्यात आला. एस्‌. एम्‌. यांनी पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यात मुख्यत: काम केले. पुण्यामधून काँग्रेसने मुंबई असेंब्लींसाठी स्वातंञ्य लढ्यात कारावास भोगलेल्या आणि काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि नामवंत वकील भा. म. उर्फ बापूसाहेब गुप्ते आणि लक्ष्मीबाई ठुसे यांना उभे केले. त्यांच्या विरोधात लोकशाही स्वराज्य पक्षाने ख्यातनाम वकील ल. ब. भोपटकर आणि अँड. सुभद्राबाई तारकुंडे यांना उभे केले. एस्‌. एम्‌., गोरे, शिरुभाऊ लिमये यांनो प्रचार मोहियेत हिरिरीने काम केले. देशभराप्रयाणेच पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातही काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस यश मिळाले. एस्‌. एम्‌. यांना इंदापूर तालुक्यात काम करताना स्थानिक परिस्थितीमुळे कटू अनुभव आले. परंतु त्यांनी निर्भयपणे सभा घेतली. त्यांची स्वातंत्र्याबद्दलची तळमळ श्रोत्यांना जाणवली आणि प्रथम आक्रमक असलेले विरोधक नंतर नरम झाले.

काँग्रेसने पुढे अधिकार स्वीकार करण्याचे ठरविले आणि बाळासाहेब खेर यांचे मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. त्या वेळी महसूल मंत्री मोगी देसाई यांनी जमीनविषयक एक बिधेयक तयार केले. या विधेयकात जमीनदारी नष्ट करण्याची तरतूद नसली तरी कुळांना कायम वहिवाट करण्याच्या हक्क दिलेला होता. कर्नाटकातील गंगाधरन व देशपांडे आणि अन्य जमुनवा, गुजरातमधील जमीनदारांचे हितसंबंधी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खोतमंडळी यांनी प्रचार केला. पुण्यात गोखले हॉलमध्ये जमीन मालकांची एक परिषद झाली आणि त्यांनी कुळांना कायम वहिवाटोचा हक्क देऊ नये, अशी मागणी ठराव करुन केली. तेव्हा एस्‌. एम्‌. हे महसूलमंत्री मोरारजी देसाई यांना भेटले आणि त्यांना सांगितले, 'जमीनदार जर वर्ग ग्हणून संघटित होत असतील तर आम्ही कुळांची परिषद बोलावू.' मोरारजी भाईंनी 'बोलवा' असे सांगितले.

एस्‌. एम्‌., ना. ग. गोरे. शिरूभाऊ लिमवे आणि रॉयवादी कार्यकर्ते यांनी पुणे जिल्हा काँग्रेसच्यावतीने कुळांचा मोर्चा काढायचा आणि पुण्यात असेंब्लीचे पावसाळी अधिवेशन भरेल त्या वेळी कौन्सिल हॉलवर मोर्चा न्यावयाचा, असा निर्णय घेतला. त्यावेळी शंकरराव देव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा मोर्चा काढण्यास विरोध होता. परंतु जिल्हा कांग्रेसच्या सर्वसाधारण सभेत एस्‌. एम्‌ च्या बाजूने निर्णय झाला. शेतकऱ्यांचा मोर्चा प्रचंड होता, महसूल मंत्र्याच्या बंगल्यावर शिष्टमंडळ गेले. तेथे प्रधानमंत्री बाळासाहेब खेर आले होते. शेतकर्‍यांच्या मोर्चाला उदेशून भाषण करताना बाळासाहेब खेर म्हणाले,

'पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा'

आपले राज्य असले तरी गरिबांना श्रमिकांना न्याय देण्यासाठी सतत काम केले पाहिजे, संघर्षही केला पाहिजे, असे एस. एम्‌ सर्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांना सांगत आणि स्वत: सतत कार्यरत असत. एस्‌. एम्‌., ना. ग. गोरे आणि शिरुभाऊ लिमये यांच्या स्वातंत्य चळवळीतील कार्यामुळे आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्‍नांवरील पुणेफामी मतांमुळे, समाजवादी पक्षाकडे ध्येयवादी तरूण आकृष्ट होऊ लागले. यांच्यामध्ये विनायकराव कुलकर्णी, बंडू गोरे, माधव लिमये, अण्णा साने, गंगाधर ओगले हे प्रमुख होते. एस्‌. एम्‌. आणि गोरे हे नेतृत्व करीत होते. एस्‌. एप. आणि गोरे हे या तहण कार्यकर्त्यांचा नियमाने अभ्यासवर्ग घेत असत. त्यावेळी लोकशक्तीचे संपादक आचार्य जावडेकर हे होते आणि पां. वा. गाडगीळ हे सहसंपादक होते. पां. वा. गाडगीळ हेही या अभ्वासवर्गात बौद्धिक घेत. ना. श. गोरे आणि पां. वा. गाडगीळ हे दोघे लेखनही करीत. त्या वेळी पुण्यातील सुप्रसिद्ध लेखक - प्रकाशक ब. गो. जोशी यांनी वादविवेचनमाला काढून पुस्तके प्रसिद्ध केली. त्या मालेत
ना. ग. गोरे यांनी 'विश्वकुटुंबवाद' आणि 'साम्राज्यशाही' ही पुस्तके लिहिली. गोरे यांनो पं. नेहरूंच्या आत्मकथेचाही मराठीत सुंदर अनुवाद केला. तो सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालेने प्रसिद्ध केला. १९३७ साली एस्‌. एम्.च्या खोलीवर एक १५-१६ वर्षांचा विद्यार्थी आला. स्वातंत्र्य चळवळ आणि समाजवाद याबद्दल या विद्यार्थ्वाने काही प्रश्‍न विचारले. मॅट्रिक पास होऊन कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या या तरूणाने खूप वाचन केले आहे, हे एस्‌. एम्‌. च्या लक्षात आले. त्याची प्रखर बुद्धिमताही त्यांना जाणवली. एस्‌. एम्‌.नी त्याला ज्या आपुलकीने वागविले त्यामुळे हाच विद्यार्थी एस्‌. एम्‌. कडे सतत येऊ लागला आणि गोऱ्यांनी त्याला अभ्यास वर्गालाही यायला सांगितले. या विद्यार्थ्यांचे नाव हेते मधू लिमये, समाजवादी गटातोल तरूण कार्यकत्यांमध्ये वयाने सवांत लहान असलेला मधू त्याच्या बुद्धिमत्तेमुळे, वादविवादातील त्याच्या अभिनिवेशामुळे एकदम चमकू लागला. एस्‌. एम्‌.शी असलेल्या त्याच्या निकट स्नेहामुळे त्याचे मित्र त्याला एस्‌. एम्‌.चा 'छावा' म्हणत.

X

Right Click

No right click

Hits: 376
X

Right Click

No right click