१३. भाऊरावांचे कुटुंबीय - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

प्रकरण तेरावे
१३. भाऊरावांचे कुटुंबीय - १

१) या ग्रंथाच्या दुसर्‍या प्रकरणात भाऊरावांच्या कुटुंबात मातोश्री सौ. गंगाबाई, वडील पायगौडा, तिघे भाऊ व दोन बहिणी असल्याचे सांगितले आहेच. वडिलांच्या निवृत्तीनंतर या सर्वांना सांभाळण्याचे व त्यांना पोसण्याचे काम भाऊरावांवर येऊन पडले होते.

२) भाऊरावांचे वडील, बांध्याने सडपातळ, उंच व श्यामल वर्णाचे होते. त्यांचा नेहमीचा पेहराव, धोतर, बंद गळ्याचा शर्ट, क्वचित प्रसंगी कोट व त्यावर उपरणे आणि डोक्यास रुमाल असे. तशी त्यांची राहणी अति साधी होती. स्वभावाने कामसू, करारी व मितव्ययी होते. शेतकऱ्यांना शेतीत फळझाडे, विशेषत: आंब्याची झाडे लावण्यास उत्तेजन देत. व्यसन म्हणाल तर मित्रासमवेत चिलीम ओढण्यास त्यांना आनंद वाटे. किर्लोस्कर आणि ओगले यांच्याकडे भाऊराव किर्लोस्करवाडीस असेपर्यंत भाऊरावांकडे त्यांचे वास्तव्य होते. भाऊरावांनी सन १९२३ नंतर सातार्‍यात वसतिगृहाच्या कामात स्वत:ला झोकून दिल्यानंतर वडील जयसिंगपूरला आपल्या वकील असलेल्या तात्या नावाच्या मुलाकडे राहत.

भाऊराव अधून मधून आपल्या आईवडिलांना भेटण्यास जयसिंगपूरला जात असत. भाऊरावांच्या लोकोपयोगी शैक्षणिक कामाचे महत्त्व सन १९३८ नंतर वडिलांना प्रकर्षाने जाणवू लागले होते. भाऊराव जयसिंगपूरला भेटीस आल्यावर पायगौंडा पाटील येण्याजाण्याचा भाडेखर्च भाऊरावांस देत. सार्वजनिक पेसा स्वत:च्या प्रवासावर खर्च करू नये अशी भाऊरावांना त्यांची ताकीद असे. एका बाळंतपणाच्या प्रसंगी सो. गंगाबाईनी त्यांना सुईणीस बोलावून आणण्यास सांगितले होते. पण पायगौंडा पाटील आपली चिलीम ओढण्यात गर्क होते. सौ. गंगाबाई रागावल्यावर पायगौंडांनी चिलीम टाकून दिली. सुईणीस आणण्यास बाहेर पडले. त्या दिवसापासून त्यांनी पुन्हा चिलमीस हात लावला नाही. भाऊरावाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. पायगौंडा पाटील एक सज्जन कुटुंबवत्सल गृहस्थ होते. सन १९४२ साली भाऊराव पाटील बडोद्यास असताना पायगौडा पाटील जयसिंगपूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे निधन पावले. भाऊराव धाय मोकलून रडले.

२) भाऊरावांच्या मातोश्री या कोल्हापूर संस्थानातील कुंभोज गावच्या चतुर्थ जैन घराण्यातील होत्या. या चतुर्थ जैनातील कर्मठपणा व स्पर्शास्पर्शसारख्या रूढीवर त्यांची श्रद्धा होती. पाणी भरताना ब्राह्मणाचा स्पर्श झाल्यास त्या घागर रिकामी करीत. उलट ब्राह्मण त्यांना आपल्या 'पाणवठ्यावर पाणी भरू देत नसत. पती पायगोंडा पाटलांच्या मानाने त्या ठेंगण्याच होत्या. मात्र नाकीडोळी निटस. गौर वर्णाच्या, अंगोपांगाने दणकट होत्या. दिसण्यात सुंदर आणि स्वभावाने कणखर व धाडसी होत्या. छत्रपती शाहू महाराजांपुढे आपल्या मुलाची कैफियत स्वतः समक्ष रथास आडवे जाऊन मांडण्याचे धैर्य त्यांनी दाखविले होते. भाऊरावांवर त्यांचा अतिशय जीव होता; तरी देखील आपल्या प्रिय पुत्राचे मरण सन १९५९ साली धैर्याने त्यांनी पचविले. भाऊरावांच्या मृत्यूनंतर २ वर्षांनी सन १९६१ साली वयाच्या ९६ व्या वर्षी गंगामातेने देह ठेवला.

४) भाऊरावांचे धाकटे बंधू तात्या भाऊरावांपेक्षा वयाने २ वर्षांनी लहान होते. मध्यम बांधा, श्याम वर्णाचे व सडपातळ होते. मॅट्रिक झाल्यानंतर आईवडिलांबरोबर भाऊरावांवर अवलंबून किर्लोस्करवाडीस राहत होते. या ठिकाणीच असताना त्यांच्या वडिलांनी जयसिंगपूरला जागा _ पैतली होती. तेथेच तात्यांनी कायमचे वास्तव्य केले. जयसिंगपूरला राहून कोल्हापूर संस्थानातील वकिलीची सनद मिळवून तेथेच शेवटपर्यंत वकिली करीत राहिले. भाऊरावांडइतको तडफ किंवा सार्वजनिक कामात रस दाखविण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. वकील म्हणूनही फार मोठा लौकिक मिळविला असेही नव्हते. एक सामान्य विवाहित माणसाचे जीवन ते जगले. शर्ट, टोपी, धोतर व कोट हा त्यांचा पेहराव होता.

५) भाऊरावांचे तिसरे बंधु श्री. बळवंतराव किंवा बाळूकाका लग्न झाल्यानंतरही काही दिवस किर्लास्करवाडीस वडील भावाकडेच राहत असत. मेट्रिक झाल्यानंतर त्यांनी अबकारी खात्यात नोकरी पत्करली. चौतीस वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले व कोल्हापुरात स्थायिक झाले. ते मध्यम बांध्याचे, पण जाडजूडही नव्हते. वर्ण सावळाच होता. शासकीय सेवेत असल्याने शर्ट, पॅट, कोट असा आधुनिक पेहराव असे. घरी धोतर वापरीत.

६) भाऊरावांचे धाकटे कनिष्ठ बंधू बंडेंद्र ऊर्फ बंडूकाका मध्यम बांध्याचे, सडपातळ, श्याम वर्णाचे होते. ते मॅट्रिकपर्यंतही शिकले नव्हते. पोलीस खात्यात त्यांनी नोकरी केली. शिक्षणासाठी किलेस्किरवाडीस व त्यानंतर सन १९२४ पासून साताऱ्यास भाऊरावांकडे होते. साताऱ्यातील वसतिगृहातील पहिल्या चार मुलांपैकी ते होते. पोलीस जमादार होऊन ते निवृत्त झाले. हे तिघे बंधू भाऊराव पाटलांना अतिशय मान देत, त्यांच्या आज्ञेचे त्यांनी कधी उल्लंघन केल्याचे ऐकिवात नाही.

भाऊरावांच्या मातोश्री गंगाबाई मात्र चारी मुलांकडे अधूनमधून राहत. भाऊरावांच्या मृत्यूसमयी त्या कोल्हापुरास बळवंतरावाकडे होत्या. भाऊरावांच्या गाडीचा ड्रायव्हर त्यांना ता. १० मे १९५९ ला कोल्हापुराहून घेऊन आला. हा उद्धव कामते ड्रायव्हर, केवळ ड्रायव्हरच नव्हता तर तो कर्मवीरांच्या कुडुंबापैकीच एक झाला होता. प्रवासांत तो कर्भवीरांचा वैयक्तिक सहचर व सेवक होता. कर्मवीरांच्या मृत्यूने तोही घायाळ झाला होता. |

७) कर्मवीर भाऊरावांच्या दोन बहिणींची लग्ने पायगौंडा पाटलांनीच उरकली होती. द्वारकाबाई ही बहीण कोल्हापूरचे प्रतिष्ठित व्यापारी आदर्गौडा पाटील यांना दिली होतो. दुसरी बहीण ताराबाई कऱहाडचे नामवंत वकोल श्री. एस. आर. ऊर्फ बाबासाहेब चोगुले यांना दिली होती. भाऊरावांची नातेवाईक मंडळी जैन असल्याने पूर्ण शाकाहारी होती. भाऊरावांच्या भावापैकी व मेव्हण्यापैकी कोणीही आज हयात नाहीत.

Hits: 482
X

Right Click

No right click