४. उपजीविकेच्या शोधात -३

Parent Category: मराठी पुस्तके Category: कर्मवीर भाऊराव पाटील

८) भाऊराव दुधगावला येऊन जाऊन असत. कोरेगावी पायगौंडा पाटलांना मात्र 'घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्याचा' भाऊरावाचा हा उद्योग आवडत नसे. एके दिवशी १९११ साली काही नातेवाईक मंडळी पायगोौंडा पाटलांना भेटण्यास कोरेगावला आली. दुपारी जेवणाच्या पंगतीस भाऊरावही होते. जेवताना पाहुण्यांपेको एकाने पायगौंडा पाटलांना विचारले, “मुलगा मोठा आहे. काय उद्योग करतो?” पायगोंडा पाटील नाराजीत म्हणाले, “काय सांगू? खातो आणि मोकाट हिंडतो.” सासरी भाऊरावांच्या पत्नीस सौ. लक्ष्मीबाई या नावाने हाक मारीत असत. सौ. लक्ष्मीबाई पंगतीत वाढीत होत्या. परक्या नातेवाईकांसमोर व पत्नीसमोर वडिलांनी पाणउतारा केला म्हणून भाऊराव ताटावरून तात्काळ उठले.
मनाशी निश्‍वय केला को, यापुढे या घरात कष्टाचीच भाकरी खावयाची. त्याच दिवशी भाऊरावांनी साताऱ्यास प्रयाण केळे. भाऊराव मानी स्वभावाचे होते. पण आईवडिलांना त्यांनी कधीही दुरुत्तरे केली नाहीत.

९) सातार्‍यात आल्यानंतर त्यांनी अनेकविध व्यवसाय केले. कोरेगावला असतानाच त्यांनी कृषी सुधारणा सोसायटी स्थापन करून तिचे काम सुरु केले होते. तिचे सभासद करण्याचे काम सोमवार पेठ, सातारा येथील पत्त्यावरून सुस केले. तशी कार्ड छापून घेतली होती ती अशी

श्री. रा. रा. भाऊ पायगौंडा पाटील ऐतवडेकर सातारा यासी -

स.न. वि. वि.
. आपले कार्ड पावले. मजकूर वाचून आनंद झाला. सदर कृषी सुधारणा सोसायटी ऊर्जितावस्थेस यावी अशी आमची मन:पूर्वक इच्छा आहे. आपले विनंतीप्रमाणे आम्ही कृषी सुधारणा सोसायटीचे मेंबर होण्यास आनंदाने तयार आहोत. आमचे नाव मेंबराचे लिस्टात दाखल करावे.
कळावे. हे विनंती.... | कका | | सही
(सदरचे पत्र तसेच दुधगाव शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रोसिडिंग बुक भाऊ दादा कुदळे यांचे सुपुत्र गुणधर यांच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध झाले.)
__ सातारच्या महाराणी जमुनाबाई, मराठा वसतिगृहाचे संस्थापक रुद्राजीराजे महाडिक यांची सदरची कृषी सुधारणा सोसायटी स्थापण्यास मदत होती. पण प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. सन १९१२-१३ साली कोरेगावचे स्नेही भाऊसाहेब बर्गे यांची शेती खंडाने घेऊन माजी सैनिकांसाठी सहकारी शेती संस्था काढण्याचा प्रयोग केला. पण पुढील साली युद्धाच्या सैनिक भरतीत हे माजी सैनिक युद्धावर गेल्याने कोल्हापूरचे डांबर प्रकरण उपस्थित झाल्याने हा प्रयोगही थांबल. याच सुमारास लाहोरच्या भारत विमा कंपनीचे व सैन्यभरतीचे प्रचारक म्हणून भाऊराव काम करीत होते. वरील विविध व्यवसायातून म्हणादी तशी प्राप्ती होत नसल्याने साताऱ्यात खाजगी शिकवणीचा जोडव्यवसाय भाऊरावांनी सुरू ठेवला होता.
१०) साताऱ्यात येऊन खाजगी शिकवण्याचा व्यवसाय सुरू - करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता यथातथा असली तरी व्यावहारिक शहाणपण भाऊरावाजवळ एव्हाना भरपूर जमले होते. त्याशिवाय का ते वरील विविध व्यवसाय करू शकले? हा व्यवसाय निवडताना अगतिकता होती हे खरे ! परंतु एकादे काम हाती घेतल्यावर त्यांत स्वतःस झोकून देण्याची जिद्द मात्र भाऊरावांच्या ठिकाणी कोल्हापुरात वाढली होती. शिक्षक होणाऱया प्रत्येकाचा अनुभव आहे की दुसर्‍यास शिकविताना स्वत: त्या विषयाची चांगली तयारी करावी लागते. भाऊराव यास अपवाद नव्हते. विषयाची तयारी कसनच ते शिकवण्या करीत. आपणास असेही दिसून येते की महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसुधारकांनी आपल्या उपजीविकेची सुरुवात खाजगी शिकवण्या किंवा शिक्षकाच्या शातून केली आहे. प्रमुख उदाहरण म. फुले व महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहे. या व्यवसायातून त्यांनी पुढे आपले जीवितकार्य किंवा ध्येय निश्‍चित केल्याचे दिसून येते. भावी काळात भाऊरावांच्या हातून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फार मोठे शैक्षणिक व सामाजिक कार्य व्हावयाचे होते म्हणूनच की काय प्रारब्ध त्यांना या व्यवसायाकडे वळवीत होते.

Hits: 396
X

Right Click

No right click