१९. छंद नसे चांगला !

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

१९. छंद नसे चांगला !

(जाति : केशवकरणी)
(परिचय - ही लावणी एका तमासगीर फडास करून दिल्यापैकी आहे.)
(चाल - 'वृषपर्व्याशी युद्ध चालले")

स्त्री : मन्मन-मित्राच्या कासारा गणिकेचा हा तुला
               गड्या रे छंद नसे चांगला

पति : अगे काय करू गे मन मोही सुंदरी
रत्री : जिवलगा असे परि रम्य मुखी ती दरी
       भुलुन रहाल जरि अज शेजारीं

       काळ-सिंह क्षोभला
       घेईल प्राण दाबुनी गळा ? १

पति : प्रेमे घाली कंठीं हस्ता नखरे करते किती
स्त्री : नव्हे ती नडग' नखे मारिती

जर खिसा खुळखुळे म्हणेल तरि मग बसा
ना तरी ढुंकुनी पाहिल ना अवदसा

पति : मजविरहित ती, सुभगा ठेवित प्रेमभाव ना भला

स्त्री : नव्हे ती लक्ष्मीहुनि चंचला २
पति : मम पद घेअुनि हळूच चुरते मृदुहस्तें कोमला
        कशी ती ठकविल सुंदरि मला
स्त्री : खायास मिळेल न कवडीही तुज जईं
       पडशील सडुनियां, हंसेल जग हें तईं

       पदमर्दन तें दूरचि राहो पैशास्तव प्रियकरा
      ओढिल बाजारीं फरफरा!

- नाशिक, १९००
* नडग > अस्वल.

 

Hits: 539
X

Right Click

No right click