चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ११

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - ११

स्वार्था मारुनि लाथ; ठोकिला रँडा जनछलशमनाला ।
परार्थसाधू श्रीचाफेकर योग्य कां न ते नमनाला ॥ १

राजकीय कट छळी देश त्या, पुढे होअुनी नाशियला ।
देशहितेच्छु श्रीचाफेकर योग्य कां न ते नमनाला ॥ २

प्राणांतीही नाचि चिकटली असत्यवाणी वदनाला ।
सत्यभाषणी श्रीचाफेकर योग्य कां न ते नमनाला ॥ ३

नष्ट कराया तयार झाले द्रविड छळति जे सुजनाला ।
अधमद्वेषी श्रीचाफेकर योग्य कां न ते नमनाला ॥ ४

आजन्मी जे कधी न ढळले जगत्प्रभूचे भजनाला ।
भक्तशिरोमणि श्रीचाफेकर बंधु योग्य शत नमनाला ॥ ५

महाघोर भवपाश तोडिला माया शिवली न मनाला ।
विरक्त पूर्णचि श्रीचाफेकर बंधु योग्य शत नमनाला ॥ ६

प्राणांविटली परी नच तुटली झटली जनहित करण्याला ।
धन्यचि मैत्री, धन्य रानडे वीर युवकही नमनाला ।॥। ७

पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासुनि निंदिति जरि घुबडें ।
वीरकथा तुमची ही गाईल पिढी पिढी नव पुढें पुढें ॥ ८

Hits: 397
X

Right Click

No right click