गीतारहस्य - प्रस्तावना - लोकमान्य टिळक - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: गीतारहस्य

सांसारिक कर्मे गौण किंबा त्याज्य ठरवून ब्रह्मज्ञान,भक्ति, वगरे नुसत्या निवृत्तिपर मोक्षमार्गाचेंच गीतेत निरूपण केलेलें आहे, हे मत जरी आम्हांस मान्य नाही, तरी मोक्षप्राप्तीच्या मार्गाचें भगवद्गीतेत मुदलीच विवेचन नाही,असेहि आमचे म्हणणे नाही, हें आरंभींच सांगणें जरूर आहे. किंबहुना प्रत्येक मनुष्याने शुद्ध परमेश्वरस्वरूपाचें ज्ञान संपादन करून तदद्वारा आपली बुद्धि होईल तितकी निर्मल व पवित्र करणे, हें गीताशास्त्राप्रमाणे त्याचें जगांतील पहिले कर्तव्य होय असें आम्हीहि या ग्रंथात स्पष्ट दाखविले आहे. परंतु हा गीतेतील मुख्य मुद्दा नव्हे. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षी कुलक्षयादि घोर पातके घडून जें युद्ध मोक्षप्राप्तिरूप आत्मकल्याणाचा नाश करणार ते करावें का करूं नये, अशा कर्तव्य मोहात युद्धारंभी अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालविण्यासाठी शुद्ध वेदान्तशास्त्राधारे कर्माकर्माचे ब त्याबरोबरच मोक्षोपायाचेहि पूर्ण विवेचन करून, आणि कर्मे कधीच सुटत नाहींत व सोडूही नयेत असे ठरवून, ज्या युक्तीने कर्मे केली म्हणजे कोणतेच पाप न लागतां अखेर त्यानेंच मोक्षहि मिळतो, त्या युक्तीचें म्हणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रथान कर्मयोगाचेंच गीतेत प्रतिपादन आहे, असा आमचा अभिप्राय आहे.

कर्माकर्माच्या किंबा धर्माधर्माच्या या विवेचनासच आधुनिक केवळ आधिभौतिक पंडित नीतिशास्र असें म्हणतात. हे विवेचन गीतेंत कोणत्या प्रकारे केले आहे हें सामान्य पद्धतीप्रमाणे गीतेवर श्लोकानुक्रमाने टीका करून दाखवितां आलें नसतें असें नाही. पण वेदान्त, मीमांसा, सांख्य, कर्मविपाक किंवा भक्ति, वगैरे शास्त्रांतील ज्या अनेक वादांच्या व प्रमेयांच्या आधारें कर्मयोगाचे गीतेत प्रतिपादन केलेले आहे, व ज्याचा उल्लेख कधी कधी फारच संक्षिप्तरीत्या केलेला असतो, त्या शाखीय सिद्धान्तांची अगाऊ माहिती असल्याखेरीज अथवा कर्मयोग गीतेतील विवेचनाचें पूर्ण मर्म सहसा लक्षांत भरत नाहीं, य!साठीं गीतेत जे जे विषय किंवा सिद्धान्त आले आहेत त्यांचे शास्त्रीयरीत्या प्रकरणशः विभाग पाडून, त्यांतील प्रमुख प्रमुख युक्तिवादांसह गीतारहस्यांत त्याचें प्रथम थोडक्यांत निरूपण केलें आहे; व त्यांतच प्रस्तुत कालच्या चौकस पद्धतीप्रमाणे गीतेच्या प्रमुख सिद्धान्तांची इतर धर्मातील व तत्तवज्ञानांतील सिद्धान्तांची प्रसंगानुसार संक्षेपानें तुलना करून दाखविली आहे.

या पुस्तकांत प्रथम दिलेला गीतारहस्य हा निबंध अशा रीतीने कर्मयोगावर एक लहानसा पण स्वतंत्र ग्रंथच आहे असे म्हणतां येईल. पण काही म्हटले तरी अशा प्रकारच्या सामान्य निरूपणांत गीतेतील सर्व श्लोकांचा व्यक्तिशः पूर्ण विबार करणे शक्य नव्हते. म्हणून अखेर गीतेचे सर्व श्लोकश: भाषान्तर देऊन पूर्वांपार संदर्भ लक्षांत येण्यास, किंवा पूर्वीच्या टीकाकारांनी आपल्या संप्रदाय-सिद्ध्यर्थ गीतेतील कांही श्लोकांची कशी ओढाताण केली आहे (गी.३.१७- १९;६.३;व१८.२पहा) हे स्पष्ट दाखविण्यास, अगर गीतारहस्यांत सागितलेल्या सिद्धान्तांपैकी गीतेतील संवादात्मक पद्धतीप्रमाणे कोणकोणते सिद्धान्त गीतेत कोठें-कोठें व कसे आले आहेत हे दाखविण्यास, टीकेच्या रूपाने भाषान्तरास जोडूनच जागोजाग मुबलक टीका दिल्या आहेत. या पद्धतीने कांही मजकुराची द्विरुक्ती झाली आहे खरी; पण गीताग्रंथाच्या तात्पर्याबद्दल सामान्य वाचकांचा सध्यां जो गैरसमज झालेला आहे तो अन्य रीतीनें पूर्ण दूर होणे शक्य नाही, अर्से वाटल्यावरून गीतारहस्यविवेचन गीतेच्या भाषान्तरापासून निराळे काढिले आहे;आणि त्यामुळें वेदान्त, मीमांसा, भक्ति वगैरे बाबतीत गीतेचे जे सिद्धान्त आहेत, ते भारत, सांख्यशारत्र, वेदान्तसूत्रे, उपनिषदे, मीमांसा वगेरे मूल ग्रंथांतून कसे व कोठकोठें आले आहेत, हे पूर्वेतिहासासह सादार दाखविण्यास, किंवा संन्यास व कर्मयोग या दोन मार्गात भेद काय हें स्पष्ट करुन सांगण्यास, अगर गीतेची इतर धर्ममतांशी व तत्त्वज्ञानांशी तुलना करून व्यावहारिक कर्मदृष्ट्या गीतेचें महत्व काय याचें योग्य निरूपण करण्यास, चांगली सोय झाली आहे.

गीतेवर अनेक प्रकारच्या टीका होऊन गीतार्थ अनेकांनी अनेक प्रकारे जर प्रतिपादिला नसता तर आमच्या ग्रंथांतील सिद्धान्तास आधारभूत असलेली मूळ संस्कृत वचने ठिकठिकाणी देण्याचें काही कारण नव्हते पण हल्लीचा काल तसा नसून आम्ही सांगितलेला गीता किंवा सिद्धान्त बरोबर आहे ढी नाही, यांबद्दल कित्येकांस शंका येण्याचा संभव आहे. म्हणून आमच्या म्हणण्यास आधार काय याचा स्थलनिंर्देश सर्वत्र केला असून, मुख्य मुख्य ठिकाणी तर मूळ संस्कृत वचनेंच भाषान्तरासह दाखल केली आहेत. पैको बरींच वचनें वेदान्तग्रंथांतून सामान्यतः प्रमाणार्थ घेण्यांत येत असल्यामुळें वाचकांस त्यांची सहजगत्या माहिती होऊन त्यांतील सिद्धान्त थ्यानांत ठेवण्यासहि त्यामुळें सोये पडेल असा हीं संस्कृत वचनें देण्याचा दुसराहि पोटहेतु आहे. तथापि सर्वच वाचक संस्कृत जाणणारे असण्याचा संभव नसल्यामुळें, एकंदर ग्रंथाची रचना अशी ठेवली आहे की, संस्कृत न जाणणारा वाचक संस्कृत श्लोक सोडून देऊन ग्रंथ वाचू लागल्यास त्याच्या वाचनांत अर्थाचा कोठेहि खंड पडू नये. यामुळे संस्कृत श्लोकांचे शब्दशः भाषांतर न देतां कित्येकदा त्यांतील सारांश देऊनच निर्वाह करून घ्यावा कागला साहे, परंतु मूळ श्लोक नेहमींच वर दिलेला असल्यामुळें या पद्धतीने कोणताहि गैरसमज होण्याची भीति रहात नाहीं.

Hits: 507
X

Right Click

No right click