जोतिबा

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे Written by सौ. शुभांगी रानडे
     वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिध्द आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऎश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.
वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.
  सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेले हे ज्योतिबाबाचे पुरातन मंदिर आहे.
श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा !
Hits: 477
X

Right Click

No right click