Designed & developed byDnyandeep Infotech

पु.ल.देशपांडे

Parent Category: व्यक्तिपरिचय

पु.ल.देशपांडे हे मराठीतील श्रेष्ट विनोदी लेखक, नाटककार व बहुरुपी कलावंत म्हणून महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत .पु.ल.देशपांडे यांचे संपूर्ण नाव पुरषोत्त्म ल्क्ष्मण देशपांडे असे आहे. त्यांचा जन्म मुंबई येथे इ.स. १९१९ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे झाले. विनोदांच्या प्रांतात त्यांनी स्वत:चे वेगळे व वैशिष्टयपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक वाड्‍मयीन मूल्याच्या दृष्टीने अतिशय वरच्या दर्जाचे आहे.


पु.ल.देशपांडे यांनी मराठी चित्रपट सृष्टीतही नावलौकिक मिळवला आहे. ‘पुढचं पाऊल’ ‘गुळाचा गणपती’हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत. त्यांच्या ’व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता .भारत सरकारने ‘पद्‍मभूषण ’हा किताब देऊन त्यांच्या वाड्‍मयीन कर्तृत्वाचा गौरव केला. तसेच ते मध्यप्रदेश शासनाकडून दिल्या जाणार्‍या ‘कालिदास सन्मान’चेही मानकरी ठरले आहेत.


ग्रंथसंपदा : खोगीरभारती, नस्ती उठाठेव, बटाटयाची चाळ, असा मी असामी, गोळाबेरीज, हसवणुक इत्यादी विनोदी लेखसंग्रह. तुझे आहे तुजपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, तुका म्हणे, पुढा

X

Right Click

No right click