Designed & developed byDnyandeep Infotech

२७. नाशिक - १९४२ प्रल्हाद केशव अत्रे

Parent Category: साहित्य संमेलने

 

साहित्य हे जीवनाची चिरंतन मूल्ये देत असते. राष्ट्राला जिवंत ठेवण्याचे कर्य केवळ साहित्यच करू शकते. बहुजन समाजची वैचारिक क्रांती घडवून आणणे हे साहित्यिकाचे कर्तव्य आहे. प्रतिगामी, अगतिक आणि जीर्ण सामाजाची बिंगे हसत हसत बाहेर काढण्यास विनोदासारखे दुसरे प्रभावी साधन नाही ही गोष्ट कोल्हटकरांनीच दाखवून दिली. मानवी जीवनात रोग, जरा, मरण, अपघात, हानी, पराभव, निराशा, अपमान, अज्ञान, मूर्खपणा इ. अनंत दु:खे भरलेली आहेत. ह्या दु:खांकडे गांभीर्याने पाहिल्यास ती दुणावल्याखेरीज राहणार नाहीत. म्हणून त्यांच्याकडे खेळकर दृष्टीने बघून जीवन सुखावह करण्यासाठी मनुष्याला विनोदाची देणगी मिळालेली आहे. विविध प्रकारचे दु:ख हा विनोदाचा एकमेव विषय आहे. समाजातील अनिष्ट रूढी अणि सवयी नाहिशा करण्यास त्यांच्यातील अनिष्टपणा आणि निरर्थकपणा हा विनोदाच्या साहाय्याने समाजापुढे उघडा करून दाखविला पहिजे. श्रावणी, शिमगा, सोवळेओवळे, निर्जळी एकादशी, धर्मांतर मृतांचे अंत्यसंस्कार इ. विषयांवर विनोदी निबंध लिहून कोल्हटकरांनी हिंदू समाजातील अनिष्ट आचारविचार व समजुती ह्यांच्यावर फारच मार्मिक टीका केली आहे. कोल्हटकरांचे हे लिखाण पुरोगामी वाङ्मयाचे उत्कॄष्ट उदा. आहे. विनोदाच्या मार्‍याला तोंड देता येत नाही. माणसाचा मूर्खपणा विनोदाने जितका उघडा होतो तितका दुसर्‍या कशाने होत नाही. म्हणून मूर्ख लोक विनोदाचे नेहमीच वैरी असतात. विनोद हा ग्राम्य, अश्लील किंवा बीभत्स कधीच असू शकत नाही. तो करणारा माणूस हा ग्राम्य, अश्लील व बीभत्स असतो. विनोदाची बदनामी करू नये. लेखक पट्टीचा कुशल नसेल तर त्याच्या हातून विनोद निर्माण व्हावयाच्या ऎवजी पांचटपणा किंवा अश्लीललताच निर्माण होते.

X

Right Click

No right click