Designed & developed byDnyandeep Infotech

८. अखेरचे पर्व - २

Parent Category: मराठी पुस्तके

आस्तिकतेचा साक्षात्कार

१९८७च्या डिसेंबरमध्ये कॅन्सरवरील केमोथेरपीच्या उपचारासाठी एस्‌. एम्‌. यांना मुंबईला टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ठेवले. ४ जानेवारी १९८८ रोजी उपचार न मानवून त्यांना रक्ताची उलटी झाली. ते बेशुद्ध झाले. काही दिवस अतिदक्षता विभागात काढल्यावर त्यांना सामान्य विभागात आणण्यात आले. त्या वेळी त्यांची शुश्रूषा करण्याकरिता दोन खासगी परिचारिका नेमण्यात आल्या, एक होती अल्बर्टीन मेंडीस. तो गोव्याची होती. तिने एकदा एस्‌.एम्‌ ना विधारले, 'तुमचा देवाधर चिश्वास आहे का?' एस्‌. एम. तिला म्हणाले, 'मी.non-believer आहे.'

रात्रपाळीची परिचारिका होती रेचेल. ती केरळातील होती. तिलाही एस्‌. एम्‌. एणा-०%७7 आहेत हे कळले होते. अत्बर्टीन आणि रेचेल य दोघीजणी, रोमन कॅषॉलिक होत्या. शिस्तीवर आणि परमेश्वरावर त्या दोघींचीही गाढ श्रद्धा होतो. एस्‌. एम्‌ त्यांना पित्यासमान वाटत. हा इतका प्रेमळ म्हातारा non-believer कसा हे त्यांना समजतच नसे. आजारोपणात एस्‌. एम्‌. अनेकवेळा चिडचिडे व्हायचे. एका रात्री रेचेलने त्यांना नेहमीप्रमाणे अंथरुणावर बसूनच बेडपॅन घेण्यास सांगितले. एस्‌. एम्‌ तिला विनवत होते, 'मला बेडपॅनवर बसू दे.' पण रेचेल त्यांना ते करू देत नव्हती. एस. एम्‌, एकदम संतापले आणि म्हणाले, 'तू स्वतःला जीझस ख्राइस्टची भक्त समजतेस पण तुझ्यात करुणा कशी ती नाहीच.' एस्‌. एम्‌.चा मनाबरचा ताबा एकदम सुटला आणि ते तिला, 'सैतानची अवलाद' म्हणाले आणि त्या क्षणी ते एकदम चरकले. आपणच आपली माणुसकी विसरलो असं त्यांना वाटलं आणि त्यांच्या डोळ्यांतून टपटप अश्रू गळू लागले. रेचेल एकदम हेलावली. तिने एस्‌. एम्‌.ना पटकन उचलून पलंगावर ठेवले आणि ती त्यांचे सांत्वन करू लागली. ती म्हणाली, 'तुम्ही असे का रडता? मघाशी मला तुम्ही अद्वातद्वा बोललात. पण तुम्ही मला पित्यासारखे आहात.' एस्‌. एम. तिला म्हणाले, "मला एकदम ख्रिस्ताची आठवण झाली. माझे चुकले म्हणून मी रडतो आहे." रेचेल म्हणाली, 'तुम्ही म्हणता की, तुमचा ईश्वरावर विशास नाही. पण तुम्ही जीझसचे भक्त आहात." एस्‌. एम्‌. यांनी 'आगळी वेगळी माणसे' या त्यांच्या पुस्तकात हा अनुभव 'ईश्वराची लेकरं' या शीर्षकाखाली सांगितला आहे. त्यांना ४0609 म्हणाली त्याबद्दल त्यांनो पुढीलप्रमाणे लिहिले आहे. 'तिचे म्हणणे खरेच होते. आपल्या भारतीव संस्कृतीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी ईश्वराचा अंश असतो, तसाच सैतानही निद्रिस्त असतो. काही क्षणांपूर्वी मनातला सैतान, जागा झाला. तो सैतान जळून गेला. तिने दिलेल्या इंजेक्शनने मला शांत झोप लागली.'

सकाळी मी रेचेलच्या हाकेने जागा झालो. ती म्हणत होती, 'पप्पाजी मैने चाय बनाई है! उठो!' मी प्रसन्न मनाने उठलो. ती नुसती माझी नर्सच नव्हती, ती माझी नात झाली होती. तिच्या माझ्यातील हा अतूट बंध मला सांगत होता, 'तू आस्तिक आहेसच!' व त्याच वेळी रेचेल, नुकत्याच आलेल्या अल्बर्टींनला म्हणत होती, 'पपाजी 6» 0अआढन्भ माझ्यातील आस्तिकतेच्या साक्षात्काराने सुखावल्या होत्या.

अखेर एस्‌. एम्‌. यांची प्रकृती खालावलो होती. यापुढे उपचारांचा फारसा उपयोग होणार नाही म्हणून त्यांना पुण्याला घरीच आणले होते. वेदना होत होत्या, पण एस. एम्‌.च्या चेहऱ्यावरचा आनंद कधी मावळला नाही. ते टी.व्ही.वर क्रिकेट मॅच पाहायचे, बातम्या ऐकायचे. किशोरी आमोणकरांच्या गाण्याच्या कॅसेटस्‌ ऐकताना त्यांचे मन एकदम प्रसन्न व्हायचे. कांचन, अजेय शुश्रूषा करीत होते. कार्यकर्तें येऊन बसत होते. एस्‌. एम्‌. सर्वांशी खेळीमेळीने बोलत. थट्टामस्करी करीत. स्वत:च्या दुखण्यावरही विनोद करीत. त्यांच्या कमरेच्या हाडाच्या आत कॅन्सर पसरला होता. ते एक दिवस म्हणाले, 'मी आयुष्यभर मागासांसाठी, पिछड्यांसाठी काम केले, म्हणून कॅन्सरही माझ्या शरीरात पीडा होऊन आला.' आता कोणत्याच औषधांचा उपयोग होत नव्हता, भूक मंदावली होती. शरीर थकत चालले होते. परंतु मन या अखेरच्या दिवसांतही समाज-चिंतनातच गुंतले होते. १ एप्रिलला पुण्याला 'समता परिषद* भरणार होती. बाबा आढाव, निळू फुले, भाई वैद्य आदींनी वा परिषदेसाठी अविश्रांत घडपड केली होतो. ३० मार्वला संध्याकाळी भाई वैद्य एस्‌. एम्‌ कडे आले. एस्‌ एम्‌.च्या शेजारी बसून भाई म्हणाले, 'मी उद्या मुंबईला जाणार आहे. समता परिषदेतील ठरावाचा मसुदा निश्चित कराववाचा आहे.' एस्‌. एम्‌. यांच्या डोळ्यांत नेहमोचे तेज आले, ते बोलू लागले. 'ठरावात दोन गोष्टी आल्या पाहिजेत. सर्च जातिधर्माच्या लोकांमध्ये समंजस्य निर्माण झाले पाहिजे आणि मागास समाजांना, जातींना न्याय मिळाला पाहिजे.' त्यांच्याने पुढे बोलवेना.

भाई वैद्य म्हणाले, 'मी ठरावात घालतो हे तुमचे विचार.' भाई मुंबईला जाऊन ३१ मार्चला रात्री षरत आले. १ एप्रिलला सायंकाळी पुण्यात साने गुरुजी स्मारकावर समता परिषद घरणार होती. १ एप्रिलला सकाळीच एस्‌. एम्‌. ची शुद्ध हरपली. नानासाहेब गोरे आणि इतर कार्यकर्ते चिंतातुर होऊन एस्‌. एम्‌.च्या घरात बसून होते आणि अखेर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता एस्. एम, यांची प्राणज्योत निमाली. एक धगधगते यज्ञकुंड शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्य दर्शनासाठी एस्‌. एम्‌. यांचे शव सानेगुरुजी स्मारकावर आणून ठेवण्यात आले. 'समता परिषद' ज्या मंडपात होणार होती त्या मंडपातच ठेवले. सकाळपासून महाराष्ट्राच्या सर्व भागांतून एस्‌ एम्‌. यांचे असंख्य अनुयायी आणि समता परिषदेचे कार्यकतें पुण्यात सानेगुरुजी स्मारकावर येत होते. दुपारी बारा वाजता अंत्ययात्रा निघण्यापूर्वी कार्यकर्तें अखेरचे वंदन देण्यासाठी एकत्र जमले. भाई वैद्य यांनी समता परिषदेच्या ठरावाबद्दल एस्‌. एम्‌. यांनी त्यांना जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले. एस्‌. एम्‌. कंच्या अपेक्षेप्रमाणे समता परिषदेसाठी तवार केलेला ठराव वाचून दाखविला, मी एस. एम्‌. यांच्या पाशी ठेवून भाई रद्ध कंठाने म्हणाले, 'समतेच्या लढ्याला या थोर नेत्याचा अखेरचा संदेश म्हणजे हा ठराव.' कार्यकर्त्यांनी उभे राहून एस्‌. एम्‌. यांना मानवंदना दिली आणि थोड्या वेळाने एम्‌. एम्‌.ची अंत्ययात्रा मार्गस्थ झाली.

X

Right Click

No right click