वसंत कानेटकर
वसंत कानेटकर हे मराठीतील एक यशस्वी नाटककार म्हणून ओळ्खले जातात. त्यांचे संपूर्ण नाव वसंत शंकर कानेटकर असे होते. त्यांचा जन्म इ.स. १९२२ मध्ये सातारा जिल्यातील रहिमतपूर या गावी झाला.त्यांचे शिक्षण पुणे, फ़लटण, सांगली या ठिकाणी झाले. वसंत कानेटकरांनी ‘वेडयाचं घर उन्हात ’हे आपले पहिले नाटक इ.स. १९५७ मध्ये लिहिले.
कांदबरीकार म्हणूनही कानेटकरांची प्रसिद्धी आहे. मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
ग्रंथसंपदा : वेडयाच घर उन्हात, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड झाली, अश्रुंची झाली फ़ुले, वादळ माणसाळतंय, हिमालयाची सावली इत्यादी नाटके. घर, पंख, पोरका इत्यादी कांदबर्या.
Hits: 463