प्रकरण २ - जीवसृष्टी अन्‌ पाणी

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन

जीवसृष्टी अन्‌ पाणी यांचे अन्योन्य संबंध

जीवसृष्टीची उत्पत्ती झाली तीच मुळी पाण्यात ! जीवसृष्टीतील प्रत्येक घटकांचा अगदी त्याच्या जन्मापासून पाण्याशी संबंध आलेला आहे. अनेक पुराव्यांच्या सहाय्याने सिद्ध झालेल्या या जीवशास्त्रीय सिद्धान्ताला प्राचीन संस्कृत वाङ्मयातही बराच आधार सापडतो. 'अप एव ससर्जादौ तासू बीजमवासृत्‌ । ' (मनुस्मृति १) हे वचनही हेच सांगते की, आधी पाणी निर्माण केले व नंतर त्यात जीव जन्मास घातले. पाण्याला समानार्थी असलेल्या 'जल' या शब्दाची व्युत्षत्ती बघितली तरी याच सिद्धान्ताची यथार्थंता पटवून द्यावयास मदत झालेली दिसते. जल म्हणजे 'जायते अस्मात्‌' यातून सर्व जन्म पावतात; व 'लीयते अस्मिन' यातच सर्व विलीन होतात.

वनस्पतिविभाग वा प्राणिविभाग ही मानवाने आपल्या सोयीसाठी केलेली जीवसृष्टीची अगदी कृत्रिम विभागणी आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून ही दोन्हीही त्याचीच लेकरे ! वनस्पतिसृष्टी काय किवा जीवसृष्टी काय, त्यांच्यातील पहिला जीव-मूळजीव-- (दोन्हींचा पूर्वज )-हा एकच आणि तो होता 'जलचर'. प्राणीसृष्टीत दिसणारे भूचर (जमिनीवर राहणारे) वा 'खेचर' (अवकाशात उडूं शकणारे) ही त्यांची मागाहून झालेली विकसित स्वरूपे आहेत.

परमेशाला संतुष्ट राखण्यासाठी मानवाने नवविधा भक्तीचा वापर केला. पाण्याने देखील त्याच रीतीने नवविध प्रकारांनी मानवावर अनुग्रह चालू ठेवला आहे (प्रकरण १ पहा). या नवविध प्रकारांची ओळख करून घेण्यापूर्वी मानवाचा किंवा एकूण जीवसृष्टीचा पाण्याशी किती घनिष्ट संबंध आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल.

वनस्पतिसृष्टी :

कित्येक हजार वर्षांपूर्वी झालेली जीवसृष्टीची उत्पत्ती समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या एककोषिक शेवालसदृश वनस्पतीपासूनच झाली असा दृढ समज आहे. यातूनच पुढे प्राणि-सृष्टी व जमिनीवर वाढणाऱ्या बहुकोषिक वनस्पती उत्क्रांत झाल्या. शेवाळे पाण्याविना जगूंच शकत नाही. याचसाठी त्यांना पाणवनस्पती म्हणून ओळखले जाते. पाण्याच्या सतत संपर्कात असल्याने या वनस्पतींच्या कोषिका पाणी शोषून घेतात व त्यामार्फत जीवनावश्यक अन्नद्रव्ये मिळवितात. कोषिकांमधील पाण्याचे प्रमाण खूप म्हणजे त्यांच्या वजनाच्या ९५ प्रतिशत इतके असते.

वनस्पती विभागातील निरनिराळ्या जातींच्या वनस्पतींचा सखोल अभ्यास केल्यास एक गोष्ट ठळकपणे दिसून येते की, वनस्पतींचा आकृतिबंध मुख्यत्वेकरून पाण्याच्या न्यूनतेवर,आधिक्यावर किवा ते मिळण्याच्या सुलभतेवर अवलंबून असतो. बहुकोषिक वनस्पतींमधील सर्व प्रकारचे संचरण पाण्याच्या माध्यमामुळेच सुलभ होते. जीवनावश्यक द्रव्यांच्या -कार्बोहायड्रेट अगर पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ-निर्मितीसाठी लागणारी खनिजे झायलेम उतकांमधूत मुळांपासून पानापर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा वर उल्लेखिलेले उपजपदार्थ पानांपासून मुळापर्यंत फ्लोएम उतकांमधून पोहोचविण्यासाठी पाणी अत्यावश्यक - असे माध्यम आहे. याच कारणामुळे पाण्याच्या राशीचा-परिमाणाचा झाडांच्या आकृती-बंधावर प्रभाव पडतो. पाण्याची दुर्मिळता, वनस्पतींना आपला जीवनपट एका वर्षापुरताच सीमित करावयाला भाग पाडते. पावसाळ्यात एकदाच मिळणा-या पाण्याचा या वनस्पती पुरेपुर उपयोग करून घेतात. त्या बहरतात, फुलतात, फळतात आणि वर्षा अखेरीस जळून जातात. वंश खंडित होऊ नये म्हणून बिया तेवढ्या मागे ठेवून जातात.

त्या मात्र पाण्याशिवायही जगू शकतात. या वनस्पती आयुष्याच्या उभारीत एखाद्या कृपणाप्रमाणे पानाचा तळवा उघडा न करता मूठ वळल्यासारखा छोटा करून ठेवतात. तसे करणे भागच असते त्यांना. नाहींतर मोठा पृष्ठभाग सूर्याला संमुख राहिल्यास पारवसनावाटे खूपसे पाणी नाहक बाहेर नाही कां फेकले जाणार? पानांची जागा काट्यांसारख्या लहान अवयवांनी घेतलेल्या जशा वनस्पती असतात तशाच पानांऐवजी पाण्याचा साठा करण्यास खोडांच्या रचनेत बदल करणारे निवडुंगही कांही कमी नाहीत. झुडुपे, झाडे किवा वृक्ष यांचा डौल देखील ठरविते ते जमिनीतील पाणीच. दृश्यभागाचा ताठा त्यांच्याच (पाण्याच्या) हातात असतो. जमिनीवरील झाडांची ऊंची जितकी अधिक तितक्‍या अधिक प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी त्या झाडाला आपली मुळे जमिनीत अधिक लांबवर पसरावी लागतात. भूगर्भात पाण्याचा साठाच नसेल तर झाडाचा ताठा राहणार कसा ?

रायवृक्षाच्या बाबतीत असे आढळून आले आहे की, उंची व ताठा कायम ठेवण्यासाठी त्याच्या मुख्य मुळाला हजारो इतके दुय्यम लहान लहान मूलरोम फुटतात व त्यांच्यामुळे ६०० कि. मी. जागा व्यापू शकतील एवढे मोठे मुळांचे जाळे जमिनीत तयार होते. वाढ होत असलेल्या कोणत्याही एका मोसमात एक झाड त्याच्या वजनाच्या २० पट पाणी शोषून घेते.

प्राणिसृष्टो :
प्राणिसृष्टीच्या बाबतीत जलचरापासून भूचरापर्यंत (मासे-बेडूक-मानव) झालेले स्थित्यंतर ' पुनरावर्तन सिद्धान्ताच्या ' रूपाने मानवी आयुष्यात स्पष्टपणे दिसून येते. गर्भाशयात असताना पाण्याच्या आवरणात सुरक्षित असलेला 'अवलंबित जीव ' जेव्हा मुक्‍त आयुष्य व्यतित करण्यासाठी मातेच्या उदराबाहेर येतो तेव्हा त्याचे जलचरातून भूचरात रूपान्तरच झालेले असते. भूचरात रूपांतर झाल्यानंतरही “ जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” या न्यायाने मानवाचा पाण्याशी असलेला संबंध तसाच अतूट राहतो. जिवंत असेपर्यंत मानवी देहातील चैतन्याची ग्वाही देते ते रक्‍तस्रावाने सळसळणारे पाणीच ! हवेचा एकमेव अपवाद सोडल्यास माणसाच्या आयुष्यात पाण्याइतके अनन्यसाधारण महत्त्व कुठल्याही अन्य पदार्थाला देता येणार नाही. हवा, पाणी व अन्न या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या गोष्टींची टक्केवारी पाहिली तर प्रत्येक माणूस ८० प्रतिशत्‌ हवा, १२ प्रतिशत्‌ पाणी व फक्त ८ प्रतिशत्‌ अन्न सेवत करतो (आकृति २'१). अन्नाविना ८० दिवस जगू शकणारा माणूस पाण्याविना मात्र १० दिवसही जगू शकत नाही-

X

Right Click

No right click

Hits: 459
X

Right Click

No right click