स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow छोटे निबंध - पक्षी
छोटे निबंध - पक्षी
लेख़क Administrator   
पोपट
पोपटाचा रंग हिरवा असतो, चोच लाल असते. अरण्यात राहणारे पोपट झाडांच्या ढोलीत राहतात. पाळीव पोपट पिंजर्‍यात राहतात. पोपट शिकविलेले शब्द बोलतात. पिंजर्‍यात अडकून पडणे हेच पोपटांच्या गोड बोलण्याचे फळ होय.
बगळा
बगळयाचा रंग पांढरा आणि मान लांब असते. बगळे पाण्यात बराच वेळ उभे राहतात आणि स्वत:चे खाद्य शोधतात. लबाड बगळे भक्ष्य पकडण्याच्या वेळी जणू काही ध्यानस्थ असतात. बगळयांच्या पांढर्‍या रांगा आकाशात मोत्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसतात.
मोर
आपल्या भारतीयांचा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचा कंठ निळा असतो म्हणून त्याला नीलकंठ असे म्हणतात.रंगीबेरंगी पिसारा म्हणजे मोराचा जन्मजात अलंकार होय. शारदेचे वाहन म्हणजे सुंदर मोर होय. ढगांच्या दर्शनाने मोर आनंदित होतात आणि पिसारा फुलवून नाच करतात.
हंस
हंसाचे शरीर शुभ्र व सुंदर असून त्याची चाल मंद असते. ब्रह्मदेवाचे वाहन म्हणजे सुंदर हंस होय. हंस जमिनीवर, पाण्यात आणि आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात. विशाल पंखांमुळे हंस उंच आकाशात उडू शकतात. पाणी व दूध वेगळे करण्याच्या बाबतीत हंस निपुण असतात असे कवि म्हणतात.
कोकिळा
कोकिळेचा रंग काळा असला तरी तिचा कुहू असा आवाज मात्र अतिशय गोड असतो. आंब्याचे झाड हे कोकिळ पक्ष्यांचे अत्यंत आवडते असते. कोकिळा स्वतःची अंडी कावळयाच्या घरट्यात ठेवतात. कोकिळांची पिल्ले कावळयाच्या पिल्लांबरोबर राहतात. मूर्ख कावळे कोकिळांच्या पिल्लांचे पालनपोषण करतात अशी कविकल्पना आहे.महणून लोक कोकिळेला दुसर्‍याकडून भरणपोषण झालेली असे म्हणतात.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color