नाडी ग्रंथ भविष्य
लेख़क Administrator   
चला नवग्रहमंदिर यात्रेला. लेखक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक

नाडी ग्रंथावर विंग कमांडर (नि) शशिकांत ओक यांचे नवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. साप्ताहिकाच्या आकारातील या नव्या पुस्तकाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असून त्यातील नवीन माहिती ओकांची आधीची पुस्तके वाचलेल्यांना व प्रथम वाचकांना आणि नाडी ग्रंथ पाहू इच्छिणाऱ्यां इतकीच व नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेल्यांनाही भावेल.

तमिळनाडू राज्यात ताडपट्यावर कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेल्या भविष्याला नाडी भविष्य म्हणतात. ह्या नाडीग्रंथाचा इंग्रजी-हिंदी व काही ठिकाणी मराठी भाषेत अनुवाद करून सांगण्याची सोय सध्या महाराष्ट्रात अनेक नाडी भविष्यकेंद्रात ठिकठिकाणी कोठे उपलब्ध आहे, त्यांचे पत्ते-फोन नंबर, फी आदीची सुधारित माहिती त्यात आहे.

उपशीर्षकात म्हटल्याप्रमाणे नाडी ग्रंथातील शांती-दीक्षा कांडातून अनेक मंदिरांच्या यात्रेला जाण्याचे आग्रहपूर्वक सांगितलेले असते. तेंव्हा मंदिरांना श्रद्धापुर्वक भेटी द्याव्या असे मनात असते. परंतु भाषेचा दुरावा, दूरचे अंतर, वेळ, पैसा व सर्व सोपस्कारकरून खरोखरच काही उपयोग होईल का अशी शंका, यामुळे यात्रा करणे लांबते वा टाळले जाते. पुजा-अर्चा, जपसाधना का करावी, यांचे फळ मिळते काय याची वैज्ञानिक कारण मिमांसा ‘शांतीदीक्षा केल्याने काय लाभ? ’ हे प्रकरण वाचल्यावर वाचकांच्या मनातील या बाबतच्या शंका दूर व्हाव्यात.

दक्षिणेतील नवग्रहांचे स्थानमहात्म्य, इतिहास, प्रत्येक ग्रहाचे व्यासकृत स्तोत्र, नैवेद्य याशिवाय नकाशा, जाण्या-राहण्याची सोय अशी उपयुक्त माहिती या पुस्तकात आहे. शिवाय नाडी ग्रंथप्रेमींतर्फे पुण्यात १४ ऑक्टोबर २००७ला झालेल्या अधिवेशनाचा अहवाल व त्यात चर्चेला आलेले विषय, आणखी चांगली सेवा देण्यासाठी ग्राहकांनी नाडीकेंद्रचालकांना केल्या गेलेल्या सुचना आदी नविन माहिती या पुस्तकाचे आणखी एक आकर्षण आहे.

एखाद्याची नाडी भविष्याची पट्टी मिळण्याची घटना ही नदीच्या पुरातील पाण्यात टाकलेल्या दोन काड्यांची भेट पुन्हा काड्याच्या पेटीत होण्याइतकी अशक्यप्राय कशी आहे या रंजक उदाहरणावरून पटवून देण्याची ओकांची हातोटी कौतुकास्पद आहे.

नाडी ग्रंथाच्या आधारे पुर्वजन्मातील व्यक्तीरेखा शोधण्यात यशस्वी झालेल्या डॉ. दिलिप नाहरांची शोधयात्रा वाचून वाचकांना थक्क व्हायला होईल. नाडीवर वेबसाईट काढणारे- उदय मेहता, बडोद्यात केंद्र चालवणारे- निलेश त्रिवेदी, तरुण उत्साही- विंग कमांडर राकेश नंदा, राजस खळदकर आदी नव्या नाडी प्रेमींचा प्रेरणादायक परिचयही यात आहे.

या पुस्तकातील कथित नवग्रह यात्रेला जाण्याकरिता विविध यात्राकंपन्यांनी पुढाकार घेऊन नाडी केंद्रांशी संपर्क केला तर अशा यात्रा आखल्या जाऊन अनेक इच्छुकांची सोय होईल.


लेखक – विंग कमांडर नि.शशिकांत ओक
मोः ०९८८१९०१४९. पाने – ५६. किंमत – रुपये ५०
प्रकाशक – नितीन प्रकाशन, १४७ बुधवार पेठ, जोगेश्वरी मंदिर लेन, अप्पा बळवंत चौक, पुणे ४११००२

फोन ०२०-२४४८३५१७

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color