मराठी माऊली
लेख़क Administrator   

माझी मराठी माऊली
साऱ्या जगाची माऊली
घरी गं माझ्या आली ----१

शालू सखूचा ल्यायिली
पैठणी बहिणाई आणिली
साऱ्या जगी देखणी ---- २

चोळी जनीच्या हाताची
जरी मुक्तीच्या काठाची
अंगी मऊ मखमली ----३

हार नाम्याने घातला
गजरा सावत्याने माळिता
पैंजण नाथा घाली ---- ४

चुडा तुक्याने भरविला
मुकुट ज्ञान्याने चढविला
सकला हाती घरी ---- ५

गजर करिती वारकरी
जमती विठूच्या नगरी
पंढरी खरी दुमदुमली---६

माझी मराठी माऊली
गंगा ज्ञानाची जाहली
दिगंतरासी निघाली
माझी मराठी माऊली ----७

 

सौ. शुभांगी सु. रानडे
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color