गुरु
लेख़क Administrator   

गुरु रे, तव नाम सुधामृत रे
भ्रमल्या जीवनी मम अंधारी
ज्ञानपथिक तू रे ---- १

अपुले अपुले म्हणुनि जपले
अपुले कोणि न झाले
रंगबिरंगी बदलुन काया
सरडे दूर पळाले
प्रेमचि दुर्मिळ रे
गुरु रे, तव नाम सुधामृत रे -- २

आपुलकीचे नाते नुरले
तोंडपुजेचे जिव्हाळे
सरता सरता सरुनि गेले
जे जे अपुले होते
अंति गणि गण रे
गुरु रे, तव नाम सुधामृत रे -- ३

 

श्री. सुरेश अदवंत, हैदराबाद
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color