हे कसले भास-आभास
लेख़क Administrator   
हे कसले भास-आभास

हे कसले भास-आभास,
तुझ्या आठवणींचा श्रावणमास !
येतोय माझिया हातांना,
तुझ्याच गजऱ्यांचा सुवास ! - १ हे कसले भास-आभास,
तुझ्या स्वप्नांची का ही आरास ?
वाहती नदीतुन हे दिवे,
अन्, नभी नक्षत्रांची रास ! - २

हे कसले भास-आभास,
हा तर तुझ्या श्वासांचा सहवास !
म्हणूनीच बघ दरवळतो,
मत्त केवड्याचा सुवास ! - ३

हे कसले भास-आभास,
तुझ्या सोबतीची का ही आस ?
छेडीला कुणी मारवा अन्,
सूर ते उदास-उदास !

 
आस

दूर तारका तुटली होती,
मी तुझी आस धरली होती ! मन हे स्वप्नविभोर होता,
प्रीत तुझ्यावर जडली होती !

उमलताच हास्य तव हे,
चांदणवेल बहरली होती !

स्पर्श होता तुझ्या गात्रांचा,
भूल मजला पडली होती !

कळले ना तव मिठीत,
रात्र कधी सरली होती !

संवाद असा मौनाचा होता,
शब्दकळाच विरघळली होती !

काय घडले, स्मरत नाही,
ती साथ अशी मंतरली होती !

- जयंत खानझोडे पो. - भिवंडी
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color