स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow एका यक्षाचे अक्षयगान
एका यक्षाचे अक्षयगान
लेख़क अविनाश टिळक   
एका यक्षाचे अक्षयगान - लेखक - अविनाश टिळक

प्रसिद्ध लेखक श्री. अविनाश टिळक यांच्या वडिलानी आपल्या पत्नीच्या मृत्युनंतर सतत अकरा वर्षे दररोज एक पानाचे पत्र आपया पत्नीस ईंदूस' लिहून संवाद साधला आणि एका अलौकिक प्रेमाचे व निष्ठेचे व्रत आचरले.

आपल्या समोर पत्नी बसली आहे असे समजून सागितलेली दिवसातील घटनांची माहिती, वाचलेले साहित्य, भोवतालचा निसर्ग आणि पूर्व स्मृतींची आठवण व मनातील भावतरंग याचा विलक्षण मिलाफ व पत्नीवरील निसीम प्रेम या पुस्तकात आढळते. वडिलांच्या मृत्युनंतर अठरा वर्षांनी हे याचे ४००० पत्रातील अजरामर साहित्य अविनाश टिळक यानी तेवढ्याच समर्थपणे एक गुंफून या पुस्तकाद्वारे जगासमोर आणले याबद्दल त्यांचे अभिनंदन. ज्येष्ठ नागरिकांना हे पुस्तक विशेष आवडेलच पण प्रत्येक विवाहित जोडप्याने हे पुस्तक वाचले पाहिजे असे मला वाटते. कारण या उदात्त प्रेमाचे दर्शन झाल्याने त्यांची एकमेकांकडे पाहण्याची द्रृष्टी बदलेल आणि वागण्यात सकारामक परिवर्तन घडेल. `जो अस्ताला गेला तो सूर्य होता, हे मला फार उशीरा कळल ! ' असे लेखकाने प्रस्तावनेत म्हटले आहे.हे पुस्तक प्रत्यक्ष वाचा
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color