स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ७१ - ८० arrow ७८. नाशिक २००५ प्रा. केशव मेश्राम
७८. नाशिक २००५ प्रा. केशव मेश्राम
लेख़क Administrator   
साहित्य क्षेत्रात राजकीय नेत्यांबद्दल अविश्वास बाळगण्याचे काहीच कारण नाही. साहित्यनिर्मिती, त्यामागचे कल्पन, चिंतन आणि आविष्करण या स्वतंत्र रीतीने, व्यक्तीच्या सहजाविष्कारातून घडणार्‍या गोष्टी आहेत. साहित्यप्रक्रियेसाठी असेच उन्मुक्त वातावरण आवश्यक असते. जीवनाचे समग्र दर्शन साहित्यातून व्हावे. मराठी भाषा कधीही मरणार नाही. मध्यम वर्ग, उच्चशिक्षित, उच्च वर्ग, आत्ताचे काही शिक्षक - प्राध्यापक, यांच्या कारभारात मराठीबद्दल सततच ढिलाई असते. पण खूप मोठा बहुजनातला वर्ग आस्थेने, भाषेच्या प्रेमाने भाषेकडे वळतो आहे. विशेषत: गौंड, गोवारी, कोलाम, कातकरी, वारली, महादेव कोळी, भिल्ल आणि आदिवासीत मोडणारे असंख्य मराठी प्रेमाने शिकताहेत, लिहिताहेत. ग्रंथव्यवहारात, नोंदी- माहितीखात्यात त्यांची संख्या खूप कमी वाटते. प्रत्यक्षात ती खूप मोठी आहे. मराठी या सर्वांसहित, प्रांजळपणे `माझी' मानणार्‍या माणसांची भाषा आहे. .
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color