स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ७१ - ८० arrow ७२. मुंबई १९९९ प्रा. वसंत बापट
७२. मुंबई १९९९ प्रा. वसंत बापट
लेख़क Administrator   

प्रत्येक प्रतिभावंत लेखक परिवर्तनाठीच आसुसलेला असतो. व्यापक आणि सखोल अर्थाने प्रत्येक नवनिर्मितीचा उगम याच वृत्तीतून होतो. कृतीशील परिवर्तनवादी अनेक विधायक आणि विघातक कृतींच्या द्वारे जो परिणाम घडवू पाहतात, तोच परिणाम प्रतिभावंत साहित्यिकांनाही अभिप्रेत असतो. किंबहुना कृतीच्या मागे स्फूर्ती देण्याचे काम साहित्याने केलेले असतं. साहित्यिकांना केवळ वाचावीर म्हणणं बरोबर नाही. उलट द्रष्टेपणाने ते भविष्यकाळाच्या वाटा दखवीत असतात. ते प्रचारक नसतात, पण प्रसारक असतात. अंतस्फूर्तीने सुचलेले विचार समर्थ शब्दांच्या माध्यमातून जे प्रसृत करतात त्याला प्रसार म्हणतात.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color