स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ६१ - ७० arrow ७०. अहमदनगर १९९७ ना. सं. इनामदार
७०. अहमदनगर १९९७ ना. सं. इनामदार
लेख़क Administrator   

नव्या ऎतिहासिक कादंबर्‍यांतून जे मानवी जीवनाचं चित्रण केलेलं असतं ते त्या त्या वेळी या जगात वावरणार्‍या हाडामांसाच्या मानवाच्यासंबंधातलं असतं. आज आपण या भूतलावर वावरतो आहोत. वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत झगडत जीवन जगतो आहोत. तसंच गतकालीन वास्तवातील जीवन एकेकाली घडत होतं आणि निसर्गक्रमानुसार बदलतही होतं. मानवी जीवन प्रवाही आहे हे आपण एकदा ध्यानी घेतलं म्हणजे त्या प्रवाहातल्या एका भागाला गतकाल म्हणून संबोधल्याने एकूण जीवनात गुणात्मक फरक पडत नाही. वर्तमानकाळाला जसा भूतकाळ भिडलेला असतो तसा भविष्यकाळही असतो, आणि गतकाळाला त्याचा वर्तमानकाळ आणि भूतकाळही असणार हे उघड आहे. त्या त्या काळात माणसं पूर्वीच्या आणि नंतरच्या काळाचा विचार करीत असणार. हे नीट समजून घेण्यासाठी वर्तमानाचा भूतकाळ आणि भूतकाळाचा वर्तमान काळ याचं भान समतोल मनानं ठेवलं तर जीवनाचं हे कोडं उलगडणार आहे. ऎतिहासिक कादंबरीचे हे जीवित कार्य आहे.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color