स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ४१ - ५० arrow ४९. १९७३ यवतमाळ - ग. दि. माडगूळकर
४९. १९७३ यवतमाळ - ग. दि. माडगूळकर
लेख़क Administrator   
गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर - लेखकाचे स्वातंत्र्य हे समुद्राच्या स्वातंत्र्यासारखे असावे. अनेक कलाप्रवाह आपल्या प्रतिभेच्या पोटी घ्यावेत. उसळावे, खवळावे, पूर्ण चंद्र कवेत घेण्याची जिद्द धरावी आणि तरीही निश्चित मर्यादा मात्र कधीच सोडू नये. मानवी स्वभावाचे मर्म शोधीत वाचकाला सत्याकडे नेणे हे साहित्याचे काम. हे सत्यही कलात्मक सत्य असते, अंतिम सत्य नव्हे.वाचकाला एक शुद्ध आनंद दान करणारे साहित्य म्हणजे चांगले साहित्य. साहित्यिकाने समाजाचे भान ठेवणे आवश्यक आहे. सार्‍याच गीतात काव्य असते असे नाही. काव्यहीन गीते जशी लिहिली जातात तशाच काव्यहीन कविताही असतात. अनुभूतीचे कलात्मक प्रकटीकरण करणे म्हणजे काव्य होय. कोणत्याही कवीला अनुभूती आली की लगेच टेबलापाशी बसून तो कविता रचीत नाही. ती अनुभूती तो अनिश्चित काळपर्यंत तो आपल्या मनात वागवितो. प्रत्यक्ष सृ जनासाठी असे काही संस्कारही तिच्यावर करतो व योग्य वेळ येताच ती अनुभूती तो शब्दबद्धही करतो.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color