स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ४१ - ५० arrow ४६. १९६५ सातारा - प्रा. वा. ल. कुलकर्णी
४६. १९६५ सातारा - प्रा. वा. ल. कुलकर्णी
लेख़क Administrator   
मराठी साहित्यसृष्टीची निर्मिती पांढरपेशा वर्गाबरोबरच अन्य थरातील लेखकांकडूनही होत असलेली पाहून प्रा. वा. ल. कुलकर्णी यांना अतिशय समाधान वाटते. परंतु नव्या स्वरूपाची कविता खाजगी बनते आहे याबद्दल त्यांना फार चिंता वाटते. ललितलेखनात आत्मविस्मृतीचा अभाव दिसतो असे त्यांचे प्रांजळ मत आहे. समीक्षकाची वृत्ती नम्र असावी अशी त्यांची धारणा आहे. आपल्या समीक्षेने साहित्यरूप घेणार्‍या चैतन्यांशाला बाधा येणार नाही याची समीक्षकाने दक्षता घ्यायला हवी. साहित्यनिर्मात्याच्या निर्मितिप्रक्रियेचे रहस्य, गूढ उकलून दाखविण्याची, किंवा त्या रहस्याची गुरुकिल्ली नेमकी कशात आहे हे दाखविण्याची धडपड समीक्षेची असते. ही धडपड करताना समीक्षेने शोधकबुद्धीची जपणूक करावी.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color