स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ३१ - ४० arrow ३८. १९५५ पंढरपूर - श्री. शं. दा. पेंडसे
३८. १९५५ पंढरपूर - श्री. शं. दा. पेंडसे
लेख़क Administrator   
श्री. शंकर दामोदर पेंडसे हे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक. त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला. संतसाहित्याची चिकित्सा करताना ते म्हणाले, की भागवत धर्म हा अंतर्बाह्य चैतन्यमय जिवंत अशा शांततेचा पुरस्कर्ता आहे व अशा शांततेच्या ध्येयाचा पुरस्कर्ता आहे. संतसाहित्याने वाढीला लावलेली प्रेमाची व आपुलकीची भावना जी सर्वांच्या हृदयात आहे, तिला परमेश्वरी भक्ती म्हणतात. अध्यात्माने विश्वात्म्याविषयी प्रेम निर्माण होते. यालाच ज्ञाननिष्ठा म्हणतात. विश्वाविषयीची कर्तव्ये आचरून ती ईश्वराला अर्पण केल्याने ती भक्ती प्रत्यक्ष आचरणात येते. हाच भागवत धर्म. यालाच टिळकांनी अध्यात्ममूलक, भक्तिप्रधानकर्मयोग म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी आदर्श भक्ताचे भव्य चित्र रेखाटले. भारतीय संस्कृतीचे संस्कार ज्यांच्यावर झाले आहेत त्यांनाच केवळ या भक्तिभावनेतील काव्य व सौंदर्य समजण्यासारखे आहे. अधिकाधिक भौतिक सुखे मिळविण्याकरिता अखंड धावपळ करणार्‍यांचे संतसाहित्याशी कधी जमणार नाही. धावून पळून पाश्चात्य दमले व आमच्या अध्यत्माकडे आले म्हणजे त्यांच्यामागून तुम्हीही याल हे ठरलेलेच आहे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color