स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने २१ - ३० arrow २५. रत्नागिरी १९४० - ना. सी. फडके
२५. रत्नागिरी १९४० - ना. सी. फडके
लेख़क Administrator   
कोणत्याही समाजाचे साहित्य हे त्या समाजाची कर्तृत्वशक्ती, विचारसंपदा आणि प्रगतिक्षमता दर्शविणारे भूषण होय. वाचक व लेखक ही साहित्याची दोन केंद्रे. सामान्य वाचकाच्या अधोगतिप्रिय रुचीला धक्के देऊन जागृत करण्याचे उंच पातळीवर नेऊन भरार्‍या मारायला लावण्याचे काम लेखकाचे आहे. साहित्याचे खरे आश्रयदाते आपण आहोत. गलिच्छ साहित्याचा धिक्कार करणे व ते आश्रयाच्या अभावी आपोआअप नष्ट होईल अशा बाण्याने वागणे हे आपण वाचक म्हणून आपले कर्तव्य आहे. अभिजात अभिरुचीची परंपरा आपण सतत कायम ठेवली पाहिजे इ. गोष्टींचे अवधान सुटू न देणे ही जागृती वाचकांच्या ठिकाणी उत्पन्न होत नसेल तर क्रांतिकारक पुरोगामी लेखकांनी ती घडवून आणण्याचा भार आपल्या शिरावर घेतला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचा अभ्युदय सत्वर व्हायचा असेल तर मराठीतल्या पुरोगामी लेखकांनी एकवटून आपल्या तेजस्वी साहित्याची अजस्र लाट एकंदर मराठी वाचकवर्गाच्या डोक्यावरून जाईल असा संकल्प केला पाहिजे. समाजाची उन्नती करू पाहतो तो पुरोगामी लेखक आणि जे ध्येयप्रेरित असल्यानं समाजाच्या पुढे असतं व जे नेटाने सामाजाला पुढे नेतं ते पुरोगामी साहित्य.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color