स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ११ - २० arrow १९. नागपूर १९३३ - नाट्याचार्य कृष्णाजी
१९. नागपूर १९३३ - नाट्याचार्य कृष्णाजी
लेख़क Administrator   
मराठी बाषा बोलणारे लोक दरिद्री असले तरी मराठी भाषा बिलकूल दरिद्री नाही. ज्ञानेश्वरी व गीतारहस्य ही मराठी भाषेची दोन अनमोल लेणी अहेत. ज्ञानेश्वरीचे कालांतर - शब्दांतर - भाषांतर म्हणजे गीतारहस्य होय, हे भाषेतील लोकसंग्रहाच्या पद्धतीकडे पाहिले असता कोणाच्याही लक्षात आल्यावाचून राहणार नाही. मराठी भाषाच पुन्हा आई झाली आहे. गेली ५०० वर्षे ज्ञानेश्वरी आईच्या पदवीला किंवा शास्त्राच्या पदवीला चढून महाराष्ट्रात सर्वांना मार्गदर्शक झाली. शब्दांचे सामर्थ्य कसे सर्वव्यापी असते याचे हे ठळक उदाहरण आहे. वेदात भाषेला धेनु असे म्हटले आहे. ही धेनु रोजच्या व्यवहाराला लागणारे दूध तर देतेच पण तसेच भक्त मिळाल्यास कामधेनूही होते.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color