स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow कविता arrow वनवासी बंधूंचे गीत
वनवासी बंधूंचे गीत
लेख़क प्रा. एच. यु. कुलकर्णी   

 कॊण आदि अन कॊण अनादि, आंम्ही भारतवासी हो ।       
 रक्त आमुचे एक असुनी, शहर गाव वनवासी हो    ।
                      आम्ही भारतवासी हो ॥ ध्रृ ॥
 
 राजमहलचा मोह सोडुनी दुर्गम रस्त्यावरी चाले    ।
 मऊ फुलांची शैय्या सोडुनी काट्यावरती पाय पडे ।
 चित्रकूट आणि पंचवटीवर वनवासी जग प्रेम करे ।
 शबरीची बोरे गोड मानुनी राम फिरे वनवासी हो  ।
                      आम्ही भारतवासी हो  ॥ १ ॥
 
 ह्त्तीच्या हौद्यावर चढुनी रणांगणी दुर्गा ही लढी   ।
 दोन्ही हाती खड्ग घेऊनी शत्रुवरती चाल  करी ।                
नारायण दल विक्रम त्यांचा अजर अमर होऊन जगी ।
 खड्गधारी हे वीर येथले शत्रूंची धुळधाण करी   ।
 मंगलगढची राणी दुर्गा गिरीजंगलची स्वामी हो  ।
                      आम्ही भारतवासी हो ॥ २ ॥
 
 परचक्राचे वादळ आले क्रूर पाशवी वृत्तीचे  ।
 वीर शिवाजीच्या शब्दाने तरुण निर्मिले भक्तीचे  ।
 सह्याद्रीची पुकार ऎकून सागर लाटा उसळी रे  ।
 मातृभूमीच्या या अभिमाने  निर्भयतेचा ऊर भरे  ।
 छत्रपतींचे स्वराज्य रक्षण शपथ सर्वजण घेती हो ।
                      आम्ही भारतवासी हो  ॥ ३ ॥
 
 उपेक्षितांची सेवा करण्या गिरी जंगलचा मार्ग धरा  ।
 स्वजनांच्या भावना चेतवुन समरसता निर्माण करा   ।
 प्रलोभनाना मिटवुन सार्‍या राष्ट्रशक्ती जागृत करा  ।
 देश धर्म निष्ठेचा नारा संकटातही अटल रहा     ।
भाषा इतक्या, वेश निराळे अंत:करणी एकी हो   ।
                     आम्ही भारतवासी हो  ॥ ४ ॥   

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color