शिक्षकदिन
लेख़क कु. मनाली भूषण परांजपे   

दरवर्षी पाच सप्टेंबरला भारतात शिक्षकदिन साजरा केला जातो. भारताचे भूतपूर्व राष्ट्न्पती डॉ. राधाकृष्णन् यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन् हे शिक्षक होते म्हणून पाच सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून पाळला जातो. यादिवशी ठिकठिकाणी शिक्षकांचा सत्कार किंवा गौरव केला जातो. पण मला असे वाटते की प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असावा व प्रत्येक आदर्श हा शिक्षकच असावा.

अगदी लहानपणापासून मनुष्य हा अनुकरणप्रिय प्राणी आहे. समजायला लागल्यापासून मुले व मुली आपापल्या आईवडिलांचे अनुकरण करतात. त्यांच्या चांगल्या-वाईट सवयी, लकबी उचलतात. वयाच्या साधारण तिसऱ्या वर्षापासून शाळेत जाऊ लागल्यानंतर तीच मुले-मुली शिक्षकांचे अनुकरण करतात. म्हणून प्रत्येक शाळेत शिक्षक हा आदर्श असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आजचे विद्यार्थी हे उद्याचे आदर्श नागरिक बनतील व देशाची सर्वांगीण उन्नती होईल.

सगळे शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असतात. ते जे कुठले विषय शिकवत असतील त्या विषयांचे त्यांना सखोल ज्ञान असावे. त्यांच्या ज्ञानाचा व त्यांच्याकडे असलेल्या माहितीचा विद्यार्थ्यांना स्वत:च्या जीवनात उपयोग करता यावा. तसेच तो विषय सहज सोपा करून शिकवण्याची हातोटी अवगत असावी. त्यांनी विद्यार्थ्ंांना समजतील अशी उदाहरणे देऊन तो विषय पटवून द्यावा. त्यांनी बोलता बोलता व आम्ही ऐकता ऐकता तास कधी संपला ते कळूच नये !

शिक्षक हे शांत, शिस्तप्रिय, अभ्यासू, स्वच्छतेची तळमळ असणारे, आदरणीय व प्रेमळ असावेत. त्यांनी वर्गात कच्चया विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरवावे. त्यांनी आम्हा मुलात इतके मिसळून जावे की आम्हाला त्यांच्याशी मोकळेपणाने वागण्यास भीती वाटू नये. आम्हाला त्यांचा नेहमी आदर वाटावा.

शिक्षकांनी आमच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत अभ्यासाशिवाय इतर अनेक कार्यक्रम ठेवावेत. तसेच विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना तयार करावे. उदा. वेगवेगळे खेळ, गायन, वादन, वक्तृत्व, चिक्षकला, निबंध, कविता, रांगोळी इ. इ. एक ना अनेक ! प्रत्येक शिक्षकाने शालेय विषयांव्यतिरिक्त एखादी कला किंवा एखादी जीवनावश्यक गोष्ट आम्हाला शिकवून त्यात आम्हाला तयार केले तर शाळा सोडून जाताना आम्ही सर्वजण सर्वगुणसंपन्न असे आदर्श विद्यार्थी बनू ! असे आदर्श विद्यार्थी हेच खरे शिक्षकांची गुणगौरवपत्रके ठरतील. पदके आणि सन्मानचिन्हापेक्षा आदर्श विद्यार्थी घडविल्याचा आनंद नक्कीच अधिक असेल !
तसेच या देशातल्या प्रत्येक आदर्शाने जर चांगला शिक्षक व्हायचा प्रयत्न केला तर आम्हा सर्वांना त्याचा भरपूर फायदा होईल. उदा. सचिन तेंडुलकरने बॅटिंग, कपिल देवने गोलंदाजी, विश्वनाथन् आनंदने बुद्धिबळ, सानिया मिर्झाने टेनिस वगैरे वगैरे. या अशा शिक्षकांच्या व आदर्शांच्या प्रयत्नानेच एक नवीन भारत घडेल. त्या भारताचे आपण सर्व आदर्श नागरिक असू ! जय हिंद !
----- कु. मनाली भूषण परांजपे वय - १२ ( नाशिक)
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color