* शतकसम्राट *
लेख़क Administrator   

अक्षरवाङ्मयदालन आम्हासाठी केले खुले
विखरुनी पडती सुविचारांची गोजिरवाणी फुले ---- १

सुंदर सोज्वळ उपमांना ना असे कधी खीळ
स्फूर्तीची मनि उसळे उर्मी नसे पोरखेळ ---- २

नाजुकहाती बकुळफुलांचा शोभे जणू हार
प्रसन्न चित्ती प्रवेश करता हासे जणू दार ---- ३

साहित्याच्या परिमलासवे डुले मोरपीस
जगी जन्मले अमर जाहले खांडेकर वि.स.---- ४

शतकाच्या ह्या सम्राटा, तू प्रणाम अमुचे घेई
शुभकार्या परि करण्या सकला स्फूर्ती तू देई ---- ५डाऊनलोड करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color