स्वागतकक्ष arrow काव्यदीप arrow प्रासंगिक arrow * मंगलागौरीची आरती *
* मंगलागौरीची आरती *
लेख़क Administrator   

जयदेवी जयदेवी मंगलागौरी
पूजनी तुझिया रमती नारी ---- ध्रु ---- जयदेवी जयदेवी--

जाईजुई अन् कुंद अबोली
गुलाब चाफा धुंद चमेली
जास्वंदी कर्दळी शुभ्र सायली
गुलबाक्षी गोकर्णी गोडुली लिली ---- १ जयदेवी जयदेवी--

मोगरा पारिजात कोरांटी
रंगीबेरंगी फुलांची दाटी
आघाडा दुर्वा बेल तुळशी
नानापरीची पत्री आणिली ---- २ जयदेवी जयदेवी--

श्रावणमासी धरणीमाता ही
रोज नवीन साडी ल्यायिली
पाहाया सृष्टीची रूपे आगळी
फुलांची ऐसी योजना केली ---- ३ जयदेवी जयदेवी--

मंगलदिनी सोनसकाळी
मंगलागौरीची पूजा बांधिली
तुझ्या कृपेची सदा सावली
लाभू दे आम्हा माय माऊली ---- ४ जयदेवी जयदेवी--

स्वर्गसुखाच्या अमोघ राशी
असती तुझिया चरणांच्यापाशी
संतति संपत्ती सौभाग्या देई
मागणे इतुकेच दुसरे न काही ---- ५ जयदेवी जयदेवी--डाऊनलोड करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color