माझे परदेशगमन भाग -१
लेख़क मधुरा रानडे   
माझे परदेशगमन भाग -१ .............................. मधुरा रानडे, ह्युस्टन
दुपारची शांत वेळ..... बाहेर ढगाळ वातावरण........ आणि घरात AC च्या थंड हवेत बसून गाणी ऐकण्याचा मोह कुणाला नाही होणार?....... मी पण अशीच गाणी ऐकत बसली आहे. कानात फक्त गाण्यांचा आणि अधुनमधुन वास्तवाचे भान आणणार्‍या कुकरच्या शिटट्यांचा आवाज.......मनात मात्र फक्त आठवणी........ आणि तेवढयात गाण्याचे सुर कानी पडतात्..........."आनेवाला पल जानेवाला है, हो सके तो इसमे जिन्दगी गुजारो, पल ये भी जानेवाला है "
मग मात्र मला वाटलं, की हातात वही आणि पेन घेउन बसावं ...... जे काही मनात दाटले आहे ते सर्व लिहुन काढावं आणि या जाण्यार्‍या क्षणाला कायमचं शब्दांमधे जखडून टाकावं. आज मनाने ठरवलंच्.... निदान एक पान तरी लिहायचंच....
आज मी इथे, साता-समुद्रापलिकडच्या देशात आणि मन मात्र भारतात. आत्ता आई-बाबा काय करत असतील्?.....माझी आठवण काढत असतील का?.... आणि आज गाणी पण अशी लागत आहेत.................... "आंखोमे सपने लिये, घरसे हम चल तो दिये, जाने ये रांहे अब ले जायेगी कंहा मिटटीकी खुशबु आये, पलकोंमे आसु लाये, पलकोंपे रेह जायेगा, यादोंका जहाँ मंजिल नयी है, अंजाना है काँरवा, चलना अकेले है यहां तनहा दिल, तनहा सफर............"
खरंच तुमच्या देशात प्रत्येकवेळी तुम्हाला कोणाच्यातरी आधाराची गरज लागत असते, आणि त्यावेळी तो आधार देणारी आपली मायेची माणसे अगदी हाकेच्या अंतरावर असतात. पण इथे मात्र, हाक मारली तर समोरच्या दगडावर आपटून ती परत तुम्हांलाच ऐकायला येइल..... but this is America.......व्यक्तिगत स्वातंत्र्याचा देश. स्थळ, काळ, समाज अशी कोणतीही बंधन स्वतःवर लादून न घेणारी इथली माणसं... प्रत्येक संकटाला स्वतःच्या हिमतीवर तोंड देणारी आणि त्यातून सावरणारी.....
प्रत्येकाला उत्सुकता असते.... कशी असेल अमेरीका?..... कशी असतील तिथली माणसं? मला पण होती. अखेरीस आम्हाला अमेरीकेला जाण्याची संधी मिळाली. मग मात्र एकच गडबड उडाली. Work permit, VISA, बरोबर न्यायच्या आणि घरी परत पाठवायच्या सामानाची बांधाबांध. आम्ही रहात असलेले घर जरी भाड्याचे असले तरी तिथल्या वास्तव्यात आम्ही अनेक आनंदाचे क्षण अनुभवले होते. त्यामुळे घर सोडताना वाईट वाटलंच.
आमचे हे पहिलेच परदेशगमन असल्याने आई-बाबा, सासु-सासरे, भाऊ सगळेच आम्हाला निरोप देण्यासाठी आणि सामानाची आवराआवर करण्यात मदत करण्यासाठी ८ दिवस आधीच बंगलोरला आले होते. त्या सगळ्यांच्या सहवासात दिवस कसे निघुन गेले कळलेच नाही. आणि जायचा दिवस येऊन ठेपला.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color