मस्त मज्जा माडी भाग - २
लेख़क Administrator   
----------------------------------------- वैभव मालसे, बंगलोर
पत्ता शोधण्याच्या कामामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे इथली भाषा. मला सगळीकडे फक्त 'जिलब्या'च दिसत होत्या. माझ्या एका मित्राच्या म्हणण्या प्रमाणे 'साउथ ईंडिअंस' हे 'सर्प वंशीय'आहेत. त्यामुळे त्यांची भाषासुध्दा नागमोडी लिपिची असते.महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्ये यात सर्वात मोठा फरक काय असेल तर तो आहे भाषेचा. मराठी आणि हिंदी मुळाक्षरे सारखी असल्यामुळे 'उत्तर' भारतीय लोकाना पाट्या वाचणे जड जात नाही. त्यामुळे कामाच्या निमित्याने घराबाहेर पडणारे, दक्षिण भारतापेक्षा पुण्यासारखी ठिकाणे पसंत करतात.
शेवटी हाँटेलचा पत्ता मिळाला, आणि एक 'टिपिकल' दक्षिण भारतीय माणूस माझ्या समोर आला.'गुड्ड मार्निंग सर..' मी नुसताच हसलो. मराठी माणूस लगेच 'ओपन' नाही. आधी पारखतो , मगच तोंड चालू करतो.मी पण त्यातलाच.
हाँटेल मस्त होतं, मी आलो तसा एक माणूस "फ्रेश वाटर, सर" म्हणत आत आला. मी लगेच त्याला ईडली आणि फिल्टर काँफीची आँर्डर दिली.दक्षिण भारतामध्ये मी कधीच 'नेस्' काँफी घेत नाही. कारणे दोन इथे काँफीला जो 'फ्रेशनेस' असतो तो आपल्याकडे मिळत नाही. आणि कशाला उगाच परदेशी कंपनीचा 'प्राँफिट' वाढवा? हे म्हणजे म्हणजे आपल्याच बागेतले आंबे, दुसर्‍याकडून , ते पण महागात घ्यायचे ,अस्सं झालं.
झक्कास पैकी 'ब्रेकफास्ट' करून मी बाहेर पडलो.सुरुवात केली ती बसची चौकशी करण्यापासून.हे आणखी एक महाभयंकर काम , एका उच्यशिक्षित कन्नड माणसामुळे शक्य झालं.बहुदा 'पेंशनर' असावा, बोलायचा थांबेचना.. मी "थँक्यू सर" ...साउथ मध्ये कोणालाही आदर दाखवायचा आसेल तर 'सर' म्हणतात.
साउथ भाषेमधे काही त्रुटी असतील तर त्यांतील आकडे (नंबर) . इकडे कोणीच कन्नड आकडे वापरत नाही.सर्व ठिकाणी 'इंग्रजी' वापरतात. नाहितर बसच्या पाट्या कन्नड मध्ये आणि बस क्रमांक इंग्रजी असं का ? म्हणजे हा माझा अंदाज नाही तर मी असं कुठेतरी वाचलं आहे.बस पाहिली आणि मला माझी चूक लक्षात आली. तो जो माझ्याशी अर्धातास बोलून गेला त्याचं शेवटचं वाक्य होतं "टेक एन्नी बस्स टू बि.टी.एम् , अँड गेट डाउन अँट्ट जयानगर"पण माझं बालवाडी शिक्षण मराठीमधून झाल्यामुळे मला कन्नड वाचता येत नाही, आणि मी बस क्रमांक विचारलाच नव्हता. आता आणखी कोणालातरी विचारल्या शिवाय पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं.मी जवळच उभ्या असलेल्या एकाला विचारलं, तर तो माझ्याकडे एखादा 'अतिरेकी' बघावा तसा बघू लागला.इथे 'नार्थ ईंडिअन्स' ना बिलकुल किम्मत नाही. त्याना असं वाटतं की 'नार्थ ईंडिअन्स' नी बँगलोर महाग केलं. मी त्याचा नाद सोडला आणि दुसर्‍याला विचारलं. त्याने नेहमी प्रमाणे 'तुटक' हिंदी मध्ये नंबर सांगितला.थोड्याच वेळात बस आली आणि मी बस मध्ये बसलो.
किमान एक-एक तास बसची वाट पहायची सवय असणार्‍या पुणेकराला , हा सुखद धक्का होता. २ वर्षापूर्वी जेव्हा बंगलूर सोडून गेलो तेव्हाच मनामध्ये ठरवलं होतं , लग्न झालं की येथे एकदा तरी , परत नक्की यायचं. आणि ती इच्छा पूर्ण होवू शकली.ही गोष्ट आठवली आणि मनामध्येच हसलो. विचार केला 'काय नशिब असतं? काही वेळेला मख्खन सारखं सरळ आणि कधी कधी ... '
बसच्या बाबतीत बंगलूरचा पहिला क्रमांक आहे भारतामध्ये , असं मी ऐकून आहे. खोटं म्हणायला कोठेही जागा नाही. म्हणजे माझा अनुभव तसाच आहे. पण या बाबतीत अनेकांची भिंन्न मते आहेत.त्याचं असं आहे की, बस मिळणे ही गोष्ट आजवर कोणिच 'प्रेडिक्ट' करू शकलं नाही आहे. ज्याच्या राशीमध्ये बस मिळण्याचा योग आहे त्याला ती मिळते.पि.एम्.टी. च्या बस या सर्व अंदाजाच्या बाहेर आहेत.ते वादळ कधी, केव्हा येईल, त्याचा अंदाज कोणतीच वेधशाळा देउ शकत नाही.आहेत म्हणायला एकादमात ४-५ बस , आणि नाहीतर 'पूज्य'एक कविता वाचली पि.एम्.टी. वर, त्यातील काही ओळी . 'मैने पुछा "कब से यहा खडे है" , कुर्सिपे बैठे बुढ्ढे तो जैसे ,जवानीसे यहा खडे है'
पुण्याच्या 'पब्लीक ट्रान्सपोर्ट' या विषयावर सुद्धा बरेच अग्रलेख छापून आले आहेत. पण दारंबंद संस्क्रुती पेपर वाचून मनस्ताप करायला शिकवते, बाहेर पडून काही कार्य करायची वेळ आली की "बस आहे , हे काय कमी आहे ?" असा युक्तीवाद (का, पळकुटेपणा ? ) ऐकायला मिळतो. आँफिसच्या वेळेमध्ये बसेस तुडुंब भरलेल्या असतात, म्हणून ज्यांना सहज फिरायच आहे, त्यानी दुपारीच फिरावं ,हा सल्ला मी अनुभवातून देउ शकतो.त्या दिवशी रविवार आसल्यामुळे , गर्दी कमी होती. मला लगेच बसण्यासाठी जागा मिळाली.पुण्यामध्ये अशी जागा मिळणार्‍याच्या चेहर्‍यावर 'जग' जिंकल्याचा आनंद, मी कित्येक वेळेला पाहिलेला आहे.आणि खिडकीजवळची जागा मिळालीतर, मला वाटतं त्याचा सत्कारच केला पाहीजे.मला पण खिडकी जवळची जागा मिळाली. मी पुन्हा एकदा दिहोबाजुला पसरलेल्या हिरव्यागार वृक्षांचा आनंद घेवू लागलो.
तेवड्यात कोणाच्यातरी भांडणाचा आवाज आला. कंन्नड लोक सरळ बोलले तरी भांडल्यासारखे वाटतात.म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि परत खिडकी मधून बाहेर बघू लागलोपण नंतर भयंकर अशुद्ध हिंदी ऐकू आलं, आणि मी त्यांचा संवाद ऐकायला सुरूवात केली.असं लक्षात आलं की, एका 'नार्थ ईंडिअन' ने एका पोलिसाला धक्का मारला , आणि तो पोलिस वैतागला.इथले पोलिस एका वेगळ्याच मिजाशित असतात,असा माझा वैयक्तीक अनुभव.पण येथे पोलिसांना खुप मानतात , आदर करतात.तर, वैतागुन त्या पोलिसाने त्या माणसाला एक ठेवुन दिली. त्या माणसाने पण त्याला मारण्याचा प्रयत्न केला.त्यावर आमचे आदरणीय कंडक्टर साहेब पुढे सरसावले "यहा ऐसा नही चलता, इधर हम पुलिसको रिसपेक्ट करता है. ये सब तुम्हारे 'नार्थ इंडिया'मे चलता होयेगा" त्यात त्या 'नार्थ ईंडिअन'चं नशिब वाइट , तो दारू प्याला होता. सर्वानी मिळुन त्याला बस बाहेर काढला.तोपर्यंत माझा स्टाँप आला आणि मी खाली उतरलो.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color