स्वागतकक्ष arrow मराठी संस्कृती arrow भक्तिपरंपरा arrow अबीर गुलाल .. - संत चोखामेळा
अबीर गुलाल .. - संत चोखामेळा
लेख़क Administrator   

अबीर गुलाल उधळीत रंग ।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color