स्वागतकक्ष arrow मराठी संस्कृती arrow भक्तिपरंपरा arrow आनंद वन भुवनी - समर्थ रामदास
आनंद वन भुवनी - समर्थ रामदास
लेख़क Administrator   

स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी

त्रैलोक्य चालिल्या फौजा
सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडली मोठी, आनंदवनभुवनी

येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी

भक्तांसी रक्षिले मागे
आताही रक्षिते पहा
भक्तांसी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी

येथूनी वाचती सर्वे
ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी

उदंड जाहले पाणी
स्नानसंध्या करावया
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी

बुडाली सर्व ही पापे
हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color