भाषांतरकार नाव नोंदणी
लेख़क Administrator   

मराठीतील अपार साहित्यसंपदा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी त्याचे अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी बांधव हे कार्य अधिक सुलभतेने करू शकतील कारण त्यांना मराठी साहित्याची जाण असतेच शिवाय स्थानिक भाषा व तिची वैशिष्ठ्ये माहीत असतात. असे भाषांतर मोठ्या प्रमाणावर झाले तर मराठी साहित्य सर्वदूर पोहोचेल व त्याचा येथील साहित्यिकांना फायदा होईल. मराठी साहित्य अधिक समृद्ध होण्यासाठी इतर भाषांतील साहित्याचे मराठीत भाषांतर वा रुपांतर करणे तर महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी बांधवांना अधिक सोपे जाईल. युनिकोड अक्षरसंच वापरून संगणकावर मराठी मजकूर लिहिणे सोपे झाल्याने आज इंटरनेटवर फार मोठ्या प्रमाणावर लोक आपले विचार मराठीतून व्यक्त करू लागले आहेत. निश्चित योजना व योग्य व्यासपीठ मिळाले तर केवळ अभिप्राय, गप्पा वा चर्चा एवढ्यापुरताच याचा उपयोग न राहता त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर पडू शकेल. मायमराठी या संकेतस्थळावर या उद्देशाने स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी लोकांचे सक्रीय सहकार्य मिळाले तर ते त्यांच्यासकट सर्वांनाच लाभदायक ठरेल.


या कार्याला व्यावसायिक संदर्भही आहे. आज जागतिकीकरणामुळे जाहिरात व प्रसारमाध्यमांसाठी मराठीत लेखन व भाषांतर करण्याची गरज वाढली आहे. महिला, विद्यार्थी व शिक्षकांना याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्य व उद्योग यांच्या प्रगतीसाठी मराठीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा व्यवसाय वृद्धींगत होण्याची गरज आहे. ज्ञानदीप आपल्या मायमराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर असा विभाग सुरू करीत आहे. असे कार्य व्यवसाय म्हणून करणार्‍या परदेशातील काही मराठी व्यक्तींनी यात सहभागी होण्याचे व नवोदितांना सर्व ते मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आहे.

आपण या उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर कृपया खालील स्वरुपात माहिती पाठवावी. (mail to ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा. )
नाव, पत्ता,
भाषांतर प्रकार -
अ) मराठीतून अन्य भाषांत भाषांतर -> १. अन्य भारतीय भाषा ( संस्कृतसहीत) २. इंग्लिश ३. अन्य विदेशी भाषा
आ) अन्य भाषांतून मराठीत भाषांतर -> १. अन्य भारतीय भाषा ( संस्कृतसहीत) २. इंग्लिश ३. अन्य विदेशी भाषा
आतापर्यंतचा अनुभव, नमुना भाषांतर, मार्गदर्शनपर लेख


नियम व अटी -
भाषांतराच्या अचुकतेची, दर्जाची, तसेच त्यात लागणार्‍या सुधारणांची जबाबदारी भाषांतरकारावर राहील.
भाषांतरकारांचा परिचय, नमुना भाषांतरे, तसेच मार्गदर्शनपर लेख, भाषांतर संकेतस्थळे, शब्दकोश संकेतस्थळे ही सर्व माहिती फक्त भाषांतरकार नोंदणीकृत सभासदांनाच पाहता येईल.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color