प्रतिज्ञा
लेख़क Administrator   
----------------------------------------- वैभव मालसे, बंगलोर
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।
---------------------------------
भारत माझा देश आहे,
तोच तो भारत ज्याचा खूप मोठा इतिहास आहे आणि उज्वल भविष्य आहे , असं लोक म्हणतात. बरोबर तोच भारत जेथे इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केलं, ज्याचा भ्रष्टाचारामध्ये बराच वरचा क्रमांक लागतो,जनसंख्येमध्ये दुसरा आणि सर्वानी मनावर घेतलं तर लवकरच पहिला क्रमांक लागेल. सारे भारतीय माझे बांधव आहेत.पण यात काही लोकांची भिन्न मते आहेत. हिंदू - मुस्लीम आजही भांडत आहेत, कित्येक लोक या भांडणामुळे बळी पडली आहेत.इतकच काय मुस्लीमांमध्ये सुध्दा पोट जाती आहेत, शिया-सुन्नी लोक आजही याच 'आपल्या' बांधवांच रक्त बघण्यासाठी प्रयत्न करत असतात.हिंदुं मध्ये ब्राम्हण आणि इतर अशी वर्गवारी झालेली आहे.त्यांच्यात सुध्दा सतत वाद होत असतात, नाही ,तर काही लोक तो वाद विसारू न देण्याचा प्रयात्न करत असतात .ख्रिश्चन लोक 'येन केन प्रकारेण' धर्म वाढवण्याच्या कामात गुंतलेले आहेत.राजकारणी लोक याच विषयाचा आधार घेउन कित्येक वर्षे खुर्च्या सांभाळून आहेत.लोक सुध्दा अंध असल्याप्रमाणे त्याचाच उदो-उदो करत आहेत.बाकी सगळं सुरळीत चालू आहे.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.तरी जास्तीत ज्यास्त लोकांना परदेशी कंपनीमध्ये नोकरी हवी असते, परदेशात जाण्यासाठी तर लोक एका पायावर तयार असतात, भारताचं नाव उज्वल करायला !! परदेशी कपडे,बूट, आणि इतर बरच काही , परदेशी म्हटलं की लोक अभिमानाने सांगतात.मग त्यासाठी कितीसिध्दा पैसे मोजायला तयार होणारे लोक , भारतीय वस्तू म्हटलं की नाकं मुरडतात. मराठी शाळा कशाबश्या तग धरुन आहेत. लोक मुलाना इंग्रजी शिकवण्या लावतात. राजकारणी लोक सुध्दा राष्ट्रभाषेबद्दल अभिमान निर्माण करू शकण्यामध्ये अपयशी ठरले आहेत.सुप्रसिध्द लोक 'नाँर्मली' परदेशी भाषेचाच वापरत करताना दिसतात.भाषेचा वापर सक्तीचा करण्यासाठी नियाम करण्याची वेळ आली आहे.सिमा प्रश्न चिघळवत ठेवण्यामध्ये राजकाराणी लोक स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे यशस्वी झाली आहेत.आजही त्या वादामुळे होणारर्‍या दंग्यांमुळे कित्येक करोड रुपयांची संपत्ती वाया जाते.परदेशी दबावापुढे राजकाराणी लोक हतबल झालेले दिसतात. चुकिच्या धोरणांमुळे आजही शेतकरी आत्महत्या करतो आहे. त्याला दिलेली मदत सुध्दा त्याच्यापर्यंत न पोहोचता राजकाराणी लोकांच्या तिजोर्‍या भरत आहे.रस्त्याची राजकारणं तर आता जगभर प्रसिध्द आहेत.
भ्रष्टाचार कमी करणारे कमी आणि वाढवणारे जास्त आहेत. आयकर कसा चुकवू यातच व्यापारी लोकांचा निम्मावेळ वाया जातो. आयकर वसुलीच्यावेळी सुध्दा सरकारचा लाचारपणा सरळ दिसून येतो.स्वत:ला सरकार म्हणवून घेणारे राजकाराणी लोक देशाचा सोडून स्वत:चा विचार करताना दिसतात.स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्याची उदाहरणे देउन मी किती महान आहे हे ठासून सांगण्याचा निर्लज्य प्रयत्न करणारे राजकाराणी गल्लो गल्ली दिसतात.देश बांधवांच्या प्रेमापोटीच आजही कित्येक बाँबस्फोट होतात, त्यांची चौकशी करण्यामध्ये कित्येक वर्षे लागून जातात.पण तरीसुध्दा मी एक भारतीय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.श्रीमंत आधीक श्रीमंत होत आहे आणि आजही कित्येक लोक उपाशीपोटी झोपत आहे.आपल्या बांधवांच्या सुरक्षीततेच्या बाबतीत सुध्दा घोटाळे होतात.आणि त्यावर उघटपणे दुर्लक्ष केलं जातं , काही पैसे खावून.मिडिया बातम्यांच राजकाराण खेळते, आणि राजकाराणी लोक पाण्याचं. प्रमाणापेक्षा ज्यास्त पाउस पडून सुध्दा आजही उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच पाणी व वीज टंचाई सुरू होते.लोक आजही आपल्या हक्कासाठी लढताना दिसतात. रक्षक भक्षक झाले आहेत.
असा एकतरी दिवस येउ दे की जेव्हा भारत माझा देश आहे आणि मी भारतीय आहे याचा मला अभीमान वाटावा.राष्ट्रगीत लागता क्षणीच आपणहून उठण्याइतका आपला देश महान व्हावा,नव्हे तर तो आपण सर्वानी मिळून करावा , हिचा एकमेव इच्छा. तेव्हाच आपण आपली प्रतिज्ञा खर्‍या अर्थाने पाळली असा अर्थ होइल.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color