स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow गणपती बाप्पा मोरया….
गणपती बाप्पा मोरया….
लेख़क Administrator   
गणपती बाप्पा मोरया….............................मानसी सहस्रबुद्धे, सनीवेल, कॅलिफोर्निया
गणपती जवळ आले म्हणजे सर्वांचे लक्ष लागतं ते म्हणजे ह्या वर्षी आरास काय करायची त्याकडे…… एकीकडे मंडळाचे कार्यकर्ते व्यस्त असतात ते आपल्या मंडळाच्या गणपतीचे कार्यक्रम ठरवण्यात….तर बाकी सर्व असतात “लक्ष्मी रोड“, “पु.ना.गाडगीळ“, “तुळ्शीबाग“,”घोडके सराफ़” अशा ठिकाणी रांगा लावून…
असं रुटीन चालू असतानाच अगदी पुण्याचं आणि त्यानून पेठेतलं उदाहरण द्यायचा झाला तर संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर यायला ऊशीर झाल्यामूळे वैतागलेल्या आईची एक comment ऐकायला मिळायची “ह्या मांडवांच्या कामांमुळे रस्त्याचा अगदी “चुथडा” झाला आहे, कीती ते traffic…बाप रे…” ( अर्थात हल्ली बोलायचा झाला तर रस्त्याची अशी अवस्था १२ महिने असते त्याला काही गणपतीचे मांडव असावे लागतात असं नाही….असो…)
हत्ती गणपती, नातू बाग, नातू वाडा, बाबू गेनू अश्या काही मोजक्याच गणपतींचे देखावे काय काय आहेत हे पेपर मधून वाचताना म्हणा किंवा ऑफीसला जाता येता कळायचा आणि अजुनच उत्सुकता वाढायची…. आणि अर्थातच दगडूशेठ आणि मंडई ह्यांची मजा काही निराळीच… आणि अशी सर्व गडबड चालू असतानाच थाटामाटात गणरायांची प्राणप्रतिष्ठापना व्हायची…..”गणपती बाप्पा मोरया असा गजर करत करत गणपती बसवणं, आरती, उकडीचे मोदक… अहाहा.. आणि मग नंतरची ती गप्पा मारत मारत लागलेली दुपरची झोप…….” हे सर्व काही औरच….आणि असा हा गणेश चतुर्थीचा दिवस संपला की प्लनिंग सुरु व्हायचा ते म्हणजे पुढच्या १० दिवसांत कधी, कुथे आणि कीती वेळा गणपती बघायला जायचा त्याचं……चारंही बाजूंनी गणपती मंडळांनी वेढलेलं आमचं घर नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांचा अड्डा बनायचं…माझा आणि बाबांचं ठरलेला प्लान असायचा तो म्हणजे आम्ही रात्रि २:०० नंतर दगडूशेठ बघायला जायचो … गर्दी टाळण्याचा तो एक प्रयत्न असायचा….
असे होत होत १० दिवस कसे जायचे ते कळायचेच नाही आणि मग पेपरमधे बातम्या सुरु व्हायच्या त्या मिरवणूकीच्या … दर वर्षी ठरलेली हेडलाईन असायची ती म्हणजे ” यंदा २० तासांत गणपती मिरवणूक आटपणार…वगैरे..वगैरे..” लवकर आटपण्याचा हा पोलिसांचा आणि सरकारचा प्रयत्न दर वर्षी मंडळाची पोरं हाणून पाडायची….. मग आमचा काही मंडळी टी.व्ही वर केबलवरच्या प्रक्षेपणात दगडूशेठ आणि मंडई बघितल्यावर गर्दी करायची ती त्याच आपल्या लाडक्या “पु.ना.गाडगीळांच्या” चौकात….
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color