स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow मराठीतील कालिकभेद
मराठीतील कालिकभेद
लेख़क Administrator   

माझिया मराठीचिये कौतुके ।
परी अमृतातेही पैजा जिंके ।

 अशी थोरवीगायिली जाते तेव्हा प्रश्न पडतो की अमृताशी पैजा जिंकणारी `मराठी ' भाषेची उत्पत्ती कशी झाली. अथवा आजची मराठी भाषा कोणकोणत्या भाषांपासून कसकशा रीतीने उत्क्रांत झाली, हे पाहाताना आपणास आज प्रचलित असलेल्या मराठी भाषेची एकूण रचना वा मध्यवर्ती आराखडा ध्यानात घेणे आवश्यक आहे.

मराठीतील कालिकभेद :-
राजकीय इतिहासाचा व भाषेच्या इतिहासाचा एकत्रित विचार केला असता राजकीय बदल हे भाषाक्रांती घडविण्यात प्रभावी ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या यादवकाळापासून इंग्रज राजवटीपर्यंतच्या मराठी भाषेच्या स्वरूपाच्या, दरम्यानच्या काळातील भाषेचे प्रकार :
 • यादवकालीन मराठी भाषा

 • बहामनीकालीन मराठी भाषा

 • शिवकालीन मराठी भाषा

 • पेशवेकालीन मराठी भाषा

 • इंग्रजकालीन मराठी भाषा
 • यादवकालीन मराठी भाषा :-
  यादवकालीन मराठीचा काळ इ. स. ११०० ते १३५० असा धरला जातो. यादवकाळात मराठीचे अगदी अस्सल स्वरूप दिसून येते. यादवकालीन मराठीवर फार्सी, इंग्रजी आदी परक्या भाषांचा प्रभाव नसून तिचे यादवकालीन स्वरूप संस्कृत - प्राकृत - अपभ्रंश या क्रमाने विकसित झालेली अस्सल मराठी असेच आहे.
  बहामनीकालीन मराठी भाषा :-
  बहामनीकालीन मराठीचा काळ इ. स. १३५० ते १६०० असा धरला जातो. या काळात परकी अंमल महाराष्ट्नत निर्माण झाला व फार्सीचा परिणाम मराठीवर झाला असे असले तरी बहामनी राज्याच्या उत्तरकालीन पाच शाह्या धार्मिकदृष्ट्या फारश्या कडव्या नसल्याने, महाराष्ट्नीय विद्वानांच्या प्रतिभेस अथवा मराठी वाङ्मयाच्या अभिवृध्दीस या काळात फारसे उत्तेजन मिळाले नसले, तरी हा काळ यासाठी प्रतिकूलही ठरला नाही. गंगाधर - सरस्वती, भानुदास, एकनाथ, दासोपंत यांसारखे संत याच काळात होऊन त्यांनी मराठी वाङ्मयात फार मोलाची भर घातली.
  शिवकालीन मराठी भाषा :-
  शिवकालीन मराठीचा काळ इ. स. १६०० ते १७०० असा धरला जातो. परक्या भाषेचे मराठीवर झालेले परिणाम पुसून टाकण्याचे व संस्कृतची मदत घेऊन भाषेस संस्कारित करण्याचे प्रयत्न याच काळात जाणीवपूर्वक करण्यात आले. रामदास, तुकाराम यासारखे संतकवी याच काळात होऊन गेले त्यांनी मराठी भाषेच्या विकासात मोलाची भर घातली.
  पेशवेकालीन मराठी भाषा :-
  पेशवेकालीन मराठीचा काळ स्थूलमानाने इ. स. १७०० ते १८५० असा धरला जातो. शिवकाळात सोडविला गेलेला फार्सीचा विळखा पेशवेकाळात परत आवळला गेला. फार्सीचा हा प्रभाव राजव्यवहारात वापरात येणाऱ्या भाषेवर अधिक पडला. अर्थात याच काळात अस्सल मराठी शाहिरी पोवाड्यांसारखे वाङ्मय व संस्कृतप्रचुर पंडिती काव्यही निर्माण झाले.
  इंग्रजकालीन मराठी भाषा :-
  सर्वसाधारणपणे इ. स. १८५० चा पुढील काळ इंग्रजकालीन मराठीचा काळ समजला जातो. सध्या प्रचलित असलेल्या शिष्ट मराठीचे स्वरूप इंग्रजकाळात प्रचलित केले. विष्णूशास्त्रीसारख्या विद्वानांनी संस्कृतची मदत घेऊन मराठी भाषा पुनर्संस्कारित केली.
  ट, ठ, ड, ढ, ण हे उच्चार त, थ, द, ध, न असे मृदू करण्यात आले.
  टेबल, कोट यासारखे शब्द चपखलपणे मराठीत येऊन बसले.
   

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color