कांद्याची भजी
लेख़क Administrator   
 
कांद्याची भजी

साहित्य :-
दोन वाट्या चण्याचे किंचित जाडसर पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ, एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ, हळद, थोडासा सोडा, तेल, कोथिंबीर.
कृती :
 प्रथम तांदळाच्या पिठात व चण्याच्या पिठात हळद, चवीप्रमाणे तिखट व मीठ, कांदा आणि कोथिंबीर घालून पीठ पाण्यात भिजवावे. त्यात चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे व चिमटीभर सोडा घालावा. सोडा घातल्यास हळद घालू नये. सोडा घातलाच पाहिजे असे नाही. पण सोडा घातल्यामुळे भजी हलकी होतात. तेल, अर्थात, जास्त लागते. नंतर भजी तळून काढावी. (टीप-भज्याच्या पिठात तुरीच्या अगर मुगाच्या डाळीचे वरणही घालतात. त्यामुळेही भजी हलकी होतात. असे वरण घातल्यास सोडा घालू नये.)
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color