रामदेवबाबा
लेख़क उषा परांजपे   
रामदेवबाबा! खरोखरच परमेश्वरानें असे व्यक्तिमत्व कस घडवले असेल? काय त्या माणसाची बुद्धिमत्ता! किती प्रचंड मनात देशभक्ती किती बोलण्याचे धाडस, केवढी हिम्मत, समाजासाठी तळमळ, स्वत:ला केवढे फीट ठेवलेय. खरोखरच अद्भूत त्याच्यापुढे सगळी, जग नतमस्तक होते आहे. तस म्हटल तर साधा दाढी मिशावाला व केसांचे जंगल. कपडे छान छोटी झोकदार फॅशनेबल रहाणी बूट टाय ह्यातील एकतरी आहे कां? नुसते बघितले तरी असे वाटते की कित्येक साधू सन्यासी बैरागी असतात त्यातीलच एक असतील, नाशिकला सिंह्स्थात तर लाखो साधू, बैरागी, संत महंत आपल्या ताफ्यासह मोठा लवाजमा घेवून येतात. त्यातील काहीतरी हत्ती, घोडे, उंट, मोठीमोठी झगझगीत वस्त्र प्रावरणे घातलेले असतात. पण रामदेवबाबा? हो खरे आहे त्यांच्या बरोबर पण मोठा ताफा असतो. पण हे कोण लोक असतात माहीत आहे?
    ओतप्रोत देशप्रेमाने भारलेले देशातील गरीब लोकांचे जीवन सुधारले पाहिजे म्हणून तन, मन, धनाने अक्षरश: पेटलेले. सर्व समाजाला जागृत करणारे, सर्वाचे आरोग्य कसे सुधारले व आपला देश जगात अव्वल स्थानवर कसा येईल हाच एक ध्यास घेतलेले अशा मंडळीचा ताफा असतो.
    मला रामदेवबाबा माझ्या आयुष्याच्या शेवटच्या वळणावर भेटले का शेवटच्या कोपऱ्यावर? ज्या वयाला साधारणत: नैराश्य, दुबळेपणा, भविष्याबद्दल चिंता विशेषतः स्वत:च्या तब्बेतीची चिंता सतावते. आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम असले तरी शारीरिकदृष्ट्या अपंग रांगते जीवन कोणालाच नको असते. इतकी हिम्मत देणारे दुसरे कोणीच नाही. त्यांचे एक वैशिष्ट्य मूर्तीपूजा नाही व अंधश्रद्धा बिलकूल नाही पण परमेश्वर सर्वव्यापी मानणारे अगदी प्रत्येक व्यक्तीत परमेश्वरी अंश आहे फक्त तो मानायला हवा प्रत्येक प्राणीमात्रात देव आहे हे जग त्याचेच इच्छेने चाललेले असते. अशी त्यांची ठाम मते आहेत. 
    रामदेवबाबा रोज आमच्या घरी येतात. आपल्याला पहाटे, सकाळी नाही जमले म्हणजे (आपल्या आळशीपणाने)किवा वीज कंपनीने अवकृपेने भेटायला त्यांचे उत्तमोत्तमविचार ऐकायला नाही मिळाले तर रात्री ८ ते ९ आमच्या हॉलमध्ये भेटतात! अरे असे काय म्हणता? लाखो लोकांच्या घरी रोजच सर्वाना भेटतातच. फक्त तुमच्याकडे वेळ पाहिजे. तुम्ही म्हणाल ही तर व्यक्तिपूजा झाली पण त्यांच्याच शब्दात व्यक्तिपूजा करू नका त्यांच्यातील व्यक्तित्वाची पूजा करा. सन्मान करा त्याचेसारखे बनण्याचा प्रयत्न करा घ्याचा अर्थ असा नव्हे की संसार सोडून सन्यासी व्हा. संसारात राहूनच आचार विचार शुद्ध सात्वीक ठेवा. चित्र नको चरित्र त्यांच्यासारखे घडविण्याचा प्रयत्न करा. 
    त्यांना फक्त हिंदू म्हणू नका. ते हिंदू आई वडीलांच्या पोटी जन्माला आले व संन्यासी धर्मामुळे भगवी वस्त्रे, पायात खडावा घालतात. पण पक्के स्वार्थी, अर्थातच काही परसेंट अतिशय चांगली निस्वार्थी नेते मंडळी आहेत पण त्यांचे घ्या बहुसंख्य स्वार्थी मंडळी काहीच बोलत नाही. त्यांना त्यांची ध्येय धोरणे राबवताना येत नाहीत. मुळात त्यांना निवडून येवूच देत नाहीत. काय वाट्टेल ते खरोखरच वाट्टेल त्या प्रकाराने त्यांना कसे पडायचे, नामोहरम करायचे आणि एकदा टिकलाच तर बारश्या दिवशी याच्या बारश्याच्या तयारीला मंडळी लागतात. रामदेवबाबा हीच परिस्थिती बदलायची आहे. 
    रामदेवबाबांनी घ्या दलदलीच्या समुद्रात भारत स्वाभिमानाच्या रूपाने एक पणती पेटवलेली आहे आणि त्यांना पक्की खात्री आहे. जबरदस्त आत्मविश्वास आहे की घ्या पणतीचे रुपांतर प्रखर कंदिलात होऊन आपण आपला देश सर्व जगात आदर्श राष्ट्र ठरू शकतो. आपल्याकडे माणूसबळ आहे. बुद्धिमत्तेला तोटा नाही निसर्गाचा वरदहस्त आहे. कष्ट करायला माणसे तयार आहेत पण हाताना काय घायला पाहिजे. उत्तम आदर्श ठेवले पाहिजेत ते मोठे काम त्याचे चालू आहे. हजारो योगशिक्षक व योगशिक्षीका सबंध देशभर कामे करीत आहेत. संपूर्ण वैचारिक क्रांती घडवण्याचे म्हण कार्य बाबांचे चालू आहे. 
    त्याचे म्हणणे असते की काही मुठभर लोक पण स्वार्थी, पापी, दुराचारी एकत्र येवून जर समाजावर राज्य करत असतील, समाजाला वेठीस धरून छळत असतील तर चांगली माणसे एकत्र येवून ही परिस्थिती बदलूया उत्तम आचार विचारांची माणसे देशाला प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवतील. चांगले लोक एकत्र येऊन काही भरीव काम का करू शकणार नाहीत? जरूर करतील. वेळ लागेल पण सुरवात तर करूया. आळस, नैराश्य, उदासीनता झटकून कामाला लागा. एक निर्व्यसनी, निरोगी, बुद्धिवान उत्साहाने रसरसलेला प्रचंड उर्जा असलेला असा समाज निर्माण करूया. भ्रष्टाचार, भूक, गरिबी, लाचारी, बेकारी, घ्यांच्या समूळ नायनाट करूया. 
    अतिरेकी बघा! किती शिस्तबद्ध रीतीने जगाचा सत्यानाश करायला टपलेले आहेत. काय त्यांची हिम्मत? प्रचंड धाडस. स्वत: मरण पत्कारून दिलेले काम पूर्णत्वास नेतातच. पण त्यांच्या मार्ग अत्यंत भयानक क्रूरपणाची हद्द ओलांडणारा आहे राक्षसी आहे. आपल्याला तर वैचारिक क्रांती करून कोणत्याही प्रकारची हिंसा न करता देशाचे भवितव्य उज्ज्वल करायचे आहे. यासाठी प्रथम प्रत्येकाने योगाचे द्वारे स्वत:ला फिट ठेवून मग देशासाठी काम करायचे आहे. त्यासाठी मन शुद्ध, चरित्र शुद्ध, निर्व्यसनी राहून देशाचे भवितव्य उज्ज्वल करूया. ते म्हणतात भावी पिढीला आपण कोणता वारसा देणार आहोत? चांगले जीवन की नरकयातना? केवढी त्यांची दूरदृष्टी!
    त्यांच्या बोलण्यात वागण्यात प्रचंड जोश असतो. निराशा हताशा कोठच्या कोठे दूर पळून जाते. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. ३० वर्षाची तपश्रर्या आहे. नुसत्या त्याच्या हसतहसत बोलण्याने प्रसंगी अती कठोर बोलण्याने माणसे प्रभावित झाल्याशिवाय रहाणारच नाहीत. अक्षरश: मंत्रमुग्ध होवून एकत्र असतात. पूर्वीच्या संतानी म्हटल्याप्रमाणे मऊमेणाहूनी आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे, अगदी तशीच त्यांची वाणी आहे.
    मला तर कधीही वाटते रामदासस्वामी परत रामदेवबाबांच्या रुपात जन्माला आले असावेत. रामदासस्वामी  शिवाजीराजांचे गुरु होते. राजे स्वामींचे मार्गदर्शक, आशीर्वाद घेत असत तद्वच आत्ताच्या राजेंमंडळी म्हणजे राज्यकर्ते त्यांच्या भाषेत देशके पेहरेदारोनी रामदेवबाबांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. असे केले तरच अनुयाई आहेतच. त्या भागातील गरीब मजदूर किसानाना नक्कीच फायदा होतोय. व शहरी लोकांना आरोग्य मिळते.
    पतंजली योग विद्यापीठ हे एक अतिभव्य स्वप्न प्रत्यक्षात साकार करताहेत हे आधुनिक राम, लक्ष्मण, रामदेवबाबा, बाळकृष्णबुवा घ्या दोघांचे हे महान कार्य इतके भव्यदिव्य चालु आहे की जगातील १ आश्चर्यच म्हणावे लागेल. बाळकृष्णबुवा एका अफाट कर्तुत्वाचा तेजस्वी तरून, उत्साहाने रसरसलेला जणुकाय रामभक्त हनुमानच!
    आस्था चॅनलचे मालक त्यांनाही आमचे कोटीकोटी प्रणाम कारण त्यांनी रोज ३.३० तास चक्क रामदेवबाबांसाठी दिलेले आहेत. आज लाखो नव्हे करोडो लोकांना आशीर्वाद व शुभेच्छा त्या लोकांना लाभत आहेत. एवढे महान कार्य चालू आहे टेलिव्हिजनमुळे आम्ही घरबसल्या हा आनंद घेवू शकतो. आमच्यासारख्या वृद्ध लोकांना तर ही घरबसल्या मेजवानीच आहे. अर्थात टी. व्ही. चे बटन दाबण्याचे कष्ट तरी घ्यावेच लागते. तुमचे आमचे सर्वाचेच जीवन नक्कीच आनंददायी होईल. एक विचार माणसाला उत्तम घडवू शकतो. किवा विचार १ क्षणात नर्कात ढकलू शकतो. कोणताही अविचारी निर्णय आयुष्याचा सत्यानाश करू शकतो. तुमच्या मनात तुम्ही उच्च विचार रुजवता की नीच हलके विचार रुजवता त्यावरच सर्व आहे. तसेच जीभ हा महान अवयव आहे तो वाट्टेल ते पोटात ढकलत असतो आणि वाट्टेल ते बडबडत असतो दोन्हीही नुकसान करतात. एकाने तब्बेत बिघडते आणि दुसऱ्याने कदाचित चुकीच्या बकवास करण्याने मार पडतो किवा वैमनस्य येते गैरसमज होतात. 
    खरे तर आमच्या आयुष्यात गुरु, बाबा, महाराज ह्यांना अजिबात स्थान नव्हते व नाही तसेच आमच्या आयुष्यात अंधश्रद्धा, धार्मिक कर्मकांड वगैरेना महत्व नाही. विश्वास नाही. पण रामदेवबाबांचा कार्यक्रम आमच्या डीश टी. व्ही. वर दिसायला लागला आणि आम्ही दोघेही एवढे प्रभावित झालो की नकळतच त्यांना गुरु मानले. खूपच आनंद मिळतो. आम्हाला तब्बेतीला पण फायदा झाला आहे.            
                   


 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color