स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow भूतकाळात डोकावताना
भूतकाळात डोकावताना
लेख़क उषा परांजपे   

         दि. ६-६-२०१५
६ मे २०१५ ची सकाळ मोठी आल्हाददायक होती. मला पहाटेस जाग आली. मी बाल्कनीचे दार उघडले आणि एकदम सुखद गारवा जाणवला खुप छान वाटले. समोरच्या आंब्याच्या झाडाची फांदी मला इतकी जवळ वाटली आणि एकदम खूप आश्चर्य वाटले काल तर ती एवढी जवळ वाटत नव्हती त्या फांदीवर ४ कैरया लटकत होत्या. आणि मी तशीच तो गारवा अनुभवत डोळे मिटून उभी होर्ते. आणि मग मी मनाने ४७ वर्षे मागे गेले. केवढा मोठा काळ. तो सकाळ ६ मे १९६८ सकाळी ६ ची वेळ अगदी असाच गारवा थंड हवा. इतका काळ लोटला माझ्या आयुष्यातील तो दिवस आणि आत्ता २०१५ सालातील दिवसाची सकाळ ६ मे २०१५ . 
    माझ्यासाठी काळाने कुस बदलली होती. तेव्हा आम्ही दोघे व आमची २ पिल्ले छोटी छोटी आणि आज त्या पिल्लांची पिल्ले तारुण्यात आली आहेत. मोठा नातू तरून आहे बाकीची तिन्ही किशोरावस्था व तारुण्यावस्था ह्याच्या सीमारेषेवर आहेत. पण अतिशय हुशार, संमजस अशी गुणी नातवंडे आम्हाला लाभली आहेत. अर्थात त्यांना घडवण्यात त्यांच्या आईवडिलांचे विशेषतः आयांचे योगदान मह्त्वाचे आहे. आमच्या सुना नोकऱ्या करणाऱ्या नसल्या तरी उत्तम गृहिणी नक्कीच आहेत. बाबा लोकांना वेळ नसतोच त्यामुळे मुलांची सगळी जबाबदारी आयानाच निभवावी लागते. मुलांना योग्य वळण लावणे त्यांच्या अभ्यासाकडे सतत लक्ष देणे त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा त्यांची शाळा कॉलेज ह्या सर्व गोष्टी वेळेवर लक्ष ठेवून परत संसार सभाळणे आले गेले सर्व बघावे लागतेच. 
    ४७ वर्षापूर्वी आम्ही देवळाली कँप ह्या स्टेशनवर उतरतो तेव्हाची पहाट व आजची पहाट अगदी सारखीच होती. तशीच हवा तोच गरवा. आम्ही आता राहतो त्या भागात तरी भरपूर झाडे आहेत. पहाटेचे पक्षांचे आवाज कोकिळेचे कुहूकुहू तसेच आवाज येत आहेत. आणि हो ह्या नासिक शहरात कोणीतरी कोंबडा सुद्धा पाळलेला आहे. तो पण पहाटेसच आरवतो. एक फक्त मोठा बदल झाला आहे की माझे पती हे जग सोडून गेले त्याला १|| वर्षे उलटून गेले. आपला जोडीदार सोडून गेल्यानंतर उरलेल्याला जो भकासपणा येतो तो माझ्या आयुष्यात आता आलेला आहे. ती गोष्ट अटळ आहे. दोघातील एकजण तरी कोणीतरी आधी व एकजण नंतर जाणार हे सगळे अगदी खर आहे. व कोणी अमरट्टा घेवून आलेला नाही हे ही पटतय तरीपण आयुष्यातील ५३ वर्षे एकत्र आयुष्य काढल्यानंतर एकटे राहिलेल्याला पोकळी जाणवणारच! उदासपणा वाटतोच. पण स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. 
     पण माझे नशिब चांगले आहे की आहे की सोन्यासारखी मुले सुना नातवंडे सर्व देवाने दिले आहे. आर्थिक ताण पण नाही. आता फक्त एकच इच्छा आहे. देवाने मला मी चालती हिंडती फिरती असतानाच आज्ञा द्यावी कारण सर्व संसार माझा झालेला आहे. पुढची पिढी कर्तीसवरती झालेली आहे. आणि उगाच वय वाढून येथे पृथ्वीला भार ही सोसवत नाही आमच्या सारख्यांची कंटाळवाणी आयुष्य म्हणजे भविष्यात फक्त भयानक यातना इतरांना अतिशय त्रास हे सगळ मात्र वाटयाला येवू दे. आमचे हे उरलेले आयुष्याचे बोनस दिवस किती उरलेत ते तुलाच माहीत.
    औषधे बंद केली तर शारीरिक त्रास वाढेल व आपण परस्वाधीन झालो तर आपल्याला सोसायला व बाकीच्यांना करायला कोण त्रास. औषध घेतच राहीलो तर आयुष्य वाढतेय काय करावे? मला वाटतय बरीच वृद्ध माणसे ह्याच कोंडीत सापडलेली असणार पण मार्ग काय? काही लोकांना असही वाटत असेल मला पेन्शन आहे मी भरपूर इष्टेट कमवून ठेवली आहे मग मी जास्तीत जास्त का जगू नये? अरे पण बाबानो पैसा भरपूर असला तरी शरीर थकलेय त्याचे काय? वाट्टेल ते व वाट्टेल तितके खावून सोसणार आहे का? भारी भारी कपडे घालायला जमेल का? झेपेल का?
    असो कुठल्या कुठे लेखणी भरकटत गेली. अस काहींच्या बाई मनात येत राहते शेवटी काय! वय हो हे वय!   
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color