आनंदाच्या वाटा
लेख़क उषा परांजपे   
मध्यंतरी एका लेखात प्रसिद्ध लेखिका विजया वाड ह्यांनी अशी एक ओळ लिहिलेली होती. आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा
खरंच किती सार्थ आहे नाही? प्रत्येकालाच वाटते मला भरपूर सुख मिळाले पाहेजे. दु:खाच्या लवलेश नको. मी सुखांच्या राशीवर लोळले पाहिजे. देवा मला हे दे ते दे. मलाच एवढे दु:ख कां? फक्त माझ्याच नशिबी असे कां? आणि अजून एक, माझे जे काही दु:ख असेल ते जगातील सर्वात मोठे दु:ख आहे बाकी सर्व जग कसे आनंदाच्या हिदोंळयावर झुलत आहे.
    पण खरे तर तसे काही नसते. साधुसंत पूर्वीपासून हेच सांगते आले आहेत, अरे माणसा सुख दु:ख सर्वानांच आहे. वेगेवेगळ्या स्वरुपात प्रत्येकाच्या भोवती हे फेरे आहेतच. पण सुख हे मुख्यता: मानण्यावर आहे . सुख माणसाच्या मनातच असते पण आपनाला सुखाचा विसर पडतो आणि दु:ख किंवा काय कमी आहे त्याचा सतत विचार करीत रहातो . पण जगाकडे उघड्या डोळ्यांनी आणि निर्मळ मनाने बघितले तर आपण केवढे सुखी आहोत नशीबवान आहोत ते पटते. पण मनाची तशी धारणा हवी. कधीही कुणाचा हेवा करू नये करणा प्रत्येकात काही प्लस पाँईट असतातच. देव सर्वाना काही ना काही उत्तम गोष्टी देवून पाठवतोच. त्यातील एक चेहरा हसतमुख असणे. रूप हातात नसते पण जे काही वाट्याला येईल ते व्यवस्थित राहून जगाला सामोरे जाणे. तुमच्या मनात समाधान असेल तर चेहऱ्यावर दिसेलच कधीकधी अगदी प्रयत्नपूर्वक का होईना आनंदी दिसा.
    आपली व्यथा सतत जगाला सांगून रडक्या तोंडने वावरत राहीले तर लोक अशांचा कंटाळा करतात. अस मतच तयार करायचे कि ठीक आहे जे आहे त्यात कसा आनंद शोधता येईल तसेच दुसऱ्याच्या आनंदत सहभागी होता येणे हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आनंद वाटल्याने वाढतो आणि दु:ख सांगीतल्याने कमी होते. तरी पण आपला आनंद व्यक्त करताना दुसऱ्याच्या मनस्थितीचा जरूर विचार करावा नव्हे करायलाच पाहिजे. 
    मी अशी कित्येक माणसे बघितली आहेत की घरात प्रचंड प्रोब्लेम न संपणारे पण जगात वावरताना अतिशय आनंदी हसतमुख रहाता येणे ही सुद्धा एक दैवी देणगी आहे. कोणाकडे दागिने नसतील पण एक हसतमुख व्यक्ती बहीतली की मला तर तोच त्यांचा मोठा दागिना वाटतो छोट बाळ बोळक पसरून हसते. लहान मुले इतकी निरागस असतात की त्यांना पाहून आपला शीणच क्षणभर नाहीसा होतो. आता माझीच गोष्ट सांगते माझ्या वयाच्या ४७ व्या वर्षी मला स्वंयपाकाचा ओटा आणि बिल्डींगवर गच्ची मिळाली. आमच्या सिडकोच्या घरात ओटा तयार व गच्ची ८ बिराडाची मिळून का असेना पण मिळणार हे ऐकून इतका आंनद झाला कारण आत्तपर्यतच्या आयष्यात सुख मिळाले नव्हते. स्वयंपाकाच्या गँस मात्र ६६ सालापासून होता. पण शिकवण्या थोडे दिवस घेवून त्या पैशातून घेतला होता. तेव्हा फक्त २०५ रु. लागले होते. एस्सो ४ दिवसात तर बरशेनला ४ महिने वेटिंग लिस्ट होती. पण गँस खाली ठेवूनच स्वंयपाक करायचा नंतर मग जाऊबाईना क्वाटर मिळाल्याने त्यांचे स्वयंपाकाचे कपाट मला दिले. तेव्हा ओटा मिळाल्याचा आनंद होणारच ना?
    आता माझी नातवंडे हसतील कारण त्यांच्या जन्मापासून सर्व सुबत्ता असल्याने त्यांना त्या गोष्टी समजूच शकणार नाहीत. त्यांना दाखवण्यासाठी पितळी प्रायमसचा स्टोव्ह व पाटा वरवंटा जपून ठेवला आहे. मी वयाच्या १६ व्या वर्षी नायलान साडी एका नातेवाईकाडे त्यांच्या मुलीने नेसलेली बघितली. लोक बडेच होते काय मजा वाटली. प्लास्टीकचा कपडे धुण्याचा ब्रश ६० साली घरात आणावा असे वाटत होते. पण हात काय वाईट आहेत कशाला ब्रशची मिजास पण जेव्हा ब्रश आणला तेव्हा काय आनंद झाला म्हणून सांगू टेरीलीन नविन निघाले तेव्हा आम्ही असे ऐकले की त्याची पँट २ महीने धुवायला लागत नाही. ( प्लास्टर हे नाव मी साधारण ७५ साली ऐकले ) तेव्हा मनात आले आपल्याला ते कापड कधी घेणे शक्य होईल कां? आपण जेव्हा ते टेरीलीनचे कापड ह्याचेसाठी आणले तेव्हा मला असा आनंद झाला कारण ? वर लिहीले नाही कां? पण तसे नाही हे २ महिने वगैरे ती जाहिरातदारांची आयडिया.
    आपण दुसऱ्यासाठी काहीही करू शकलो तर तो तर खूपच आनंदाचा ठेवा मिळतो. मी तो माझ्या आयुष्यात कित्येक वेळा अनुभवला आहे. आपल्याच आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी बघितले तर लक्षात येते की आपल्या कृतिने आपण एखाद्याच्या निराशा मनावर फुंकर घालू शकतो. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून खूप आनंद मिळतो. नाझ्या ह्या विवाहनंतरच्या ५० वर्षात कित्येक घटना आहेत की मी लोकांसाठी थोडीफार उपयोगाला पडले. त्यांची अडचण दूर करून मी त्यातून मानसिक समाधान व आनंद मिळवला आणि संपूर्ण निस्वार्थी भावनेने केले त्यासाठी मी ही फार पैसा खर्च केला असे नाही. आपल्या कामात काम जर होत असेल तर आणि खरोखरच तशी त्यांची परिस्थिती असेल तर त्यासाठी जरा वेळ आणि थोडी पायपीट करावी लागलो पण त्या बदल्यात मला कायमचे आत्मीक समाधान मिळाले. 
    दुसऱ्याच्या उपयोगी आपण थोडेतरी पडू शकलो हा आनंद मी कायमस्वरूपी मिळवला. आपल्या गोड वाणीने सुद्धा बरेच साध्य होते. त्यामुळे आनंदाच्या वाटा शोधायला कोठे दूर जायला नको. प्रत्येकाच्या मनातच आनंद असतो. प्रत्येकाच्या मनात देव आणि राक्षस लपलेला असतो. त्यातील कोणाला तुम्ही बाहेर उघड करता आणि कोणाला कायमचे दाबून ठेवता त्यावर सर्व असते.
     तेव्हा सतत आनंदी रहा, आनंदी दिसा, तसे वागण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. पॉझीटीव विचार करा, माझे एक दीर नेहमी काहीही झाले तरी म्हणतात ‘नो प्रोब्लेम’ खरच किती एकदम हलके वाटते नां? हे सगळे वाचयला बरे वाटले तरी आचरणात आणायला कठीण असते. तरी पण त्या दिशेने विचार करायला काय हरकत आहे?      
 


 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color