स्वागतकक्ष arrow सय arrow कांदा बटाटा
कांदा बटाटा
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

भाजीत भाजी पहिला मान
कांदाबटाट्याने सजले पान . . . १      

जिवलग खरे पण स्वभाव वाकडा
जहाल नि मवाळ छत्तिसाचा आकडा . . . २

कांदा सारखा चिडायचा
रागराग फार करायचा . . . ३

रागाने लालबुंद व्हायचा
सार्‍यांच्या डोळा पाणी आणायचा . . .  ४

बटाटा समजूत काढायचा
कध्धी नाही रागवायचा . . . ५

सार्‍यांना मदत करायचा
मिळून मिसळून वागायचा . . .  ६

सारे कांद्याला हसू लागले
चिडका बिब्बा म्हणू लागले . . . ७

कांदा पटकन्‌ रुसला
कोपर्‍यात जाऊन बसला . . . ८

मुळूमुळू रडू लागला
पळत पळत बटाटा आला . . .  ९

कांद्याला म्हणे हळू बटाटा
तू तर मोठा धीराचा बेटा . . . १०

सार्‍यांशी गोड गोड बोलावे
कुणा कधी ना रागवावे . . . ११

तेंव्हापासून कांदा गोड बोलू लागला
लाल रंग सोडून पांढरा झाला . . . १२

दोघांची छान गट्टी जमली
कांदा बटाट्याने रंगत आणली . . . १३

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color