स्वागतकक्ष arrow सय arrow काळी घोंगडी
काळी घोंगडी
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

आकाशीचे ग्रहगोलचि ते खुणावती सारखे
परि तारकांची घरातल्या त्या सर न येऊ शके . . . १

भव्यदिव्य त्या राजगृहातिल वैभव वाटे मुके
झोपडीतले गूळपाणीही वाटे अति बोलके . . . २

ऎक सखये सोनेचांदी दागदागिने फुके
शरीरसंपदा, निर्मलसे मन हीच खरी गे सुखे . . . ३

अगणित असति देवदेवता सकलजना ठाऊके
परि विटेवरच्या विट्ठलाविण वाटे सारे फिके . . . ४

स्वर्गलोकीच्या सुखासनीही झोप न येई सुखे
मृत्युलोकीची काळी घोंगडी बोलावी कौतुके .   ५

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color